कळमेश्वर/ब्राह्मणी ःतळागाळातील लोकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कामासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या मागे जनतेचे भक्कम उभे राहावे, असे आवाहन माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांनी केले. कळमेश्वर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या सभेत ते बोलत होते. येथील
संत्रा मार्केट यार्ड सभागृहात ही सभा पार पडली.
कार्यक्रमाला नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष बाबाराव कोढे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण दादा भिंगारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भागवत, माजी सभापती वैभव घोंगे, पं.स. उपसभापती जयश्री वाळके, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे उपस्थित होते.
केदार पुढे म्हणाले की संस्थांचा उपयोग जनतेच्या, शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता झाला पाहिजे. शासनाच्या योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील, त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. या सरकारची विचारधारा,या सरकारचा दृष्टिकोन काय सरकार लोकांसाठी आहे की काही लोकांसाठी हे उमजतच नाही. आले दिवस निघून जातील काम करणारे त्यांच्या पाठी मागे जनतेने उभे राहिले पाहिजे. देशात खताची टंचाई त्याचे वाढलेले भाव बघून रासायनिक खताचा कमी वापर करणे अत्यावश्यक झाले आहेत.
शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होत असताना त्यात कशाही प्रकारचा गोंधळ होता कामा नये. प्रत्येक शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळालाच पाहिजे. त्याची काळजी तालुकास्तरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , खरेदी विक्री समिती पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी घेतली पाहिजे असे आदेशही पदाधिकाऱ्यांना आमदार सुनील केदार यांनी दिले. सभेचे प्रास्ताविक खरेदी विक्रीचे अध्यक्ष बाबाराव कोडे यांनी केले. तर बाजार समितीचे सभापती बाबा पाटील, मोहपा ऍग्रोचे वासुदेव निंबाळकर यांनी विचार व्यक्त यांनी केले. कार्यक्रमाला पिंकी कौरती, महेंद्र डोंगरे, किशोर मोहोड,पं.स.सदस्य प्रभाकर भोसले, विजय भांगे ,मालतीबाई वसू, प्रतिभा पालटकर, ॲड ठवरे, संस्थेचे उपाध्यक्ष आशीष देशमुख, वीरेंद्रसिंह बैस, अरविंद रामावत, गुणवंतराव चौधरी माजी अध्यक्ष शंकरराव देशमुख ,सुभाषराव कुरळकर, नरेंद्र पालटकर, राजेंद्र सुके, बाबाराव नागपुरे,प्रदीप चनकापुरे,विठ्ठलराव हिवरे,दामोदर ठाकरे, विजय गिरी, सुरेश डोंगरे, प्रभाकर रानडे, धर्माजी आसोले, सुरेश डफरे, संजय धोगडी, विनोद धोटे, राजेंद्र डेहनकर उपस्थित होते. संचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले. अरुण कोल्हे,अण्णाजी चव्हाण, अभय राऊत यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.