चंद्रपूर ः महानगरपालिकेत आर्थिक चणचण असताना पालिकेची ‘प्रतिमा’ सुधारण्यासाठी चोवीस लाखांचे प्रसिद्धीचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला दिले. दुसरीकडे कोरोनाच्या काळात अठरा लाख रुपयांचे रुग्णालय घेण्याचा प्रस्ताव मनपात आला होता. परंतु मनपा प्रशासनाने त्याऐवजी प्रसिद्धीच्या कंत्राटाला हिरवी झेंडी दाखवली. आता याच्या विरोधात शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी आक्रमक झाले असून कंत्राट रद्द करा अन्यथा आंदोलन करून असा इशारा त्यांनी दिला.
कोरोनाच्या संकटात अनावश्यरक खर्चात कपात करा, असे शासनाने निर्देश दिले. त्याउपरही चंद्रपूर मनपाने नागपूूर येथील आयटी ग्राफ या कंपनीला प्रसिद्धीचे कंत्राट दिले. मनपाची आर्थिक स्थिती बघता हे कंत्राट देण्यास अधिकारी उत्सुक नव्हते. मात्र, मनपातील एका जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या पतीने अधिकाऱ्यावर दबाव आणून ‘फाईल’ पुढे सरकविण्यास भाग पाडले, असा आरोप तिवारी यांनी केला. विशेषम्हणजे कोरानोच्या काळात ऑक्सिधजन आणि व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका नाही. त्यासाठी मनपाच्या तांत्रिक विभागाने 15 जानेवारी 2020 रोजी अठरा लाख रुपयांच्या व्हेंटिलेटर युक्त रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दिला होता. आजपर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही. दुसरीकडे प्रसिद्धीचे कंत्राट मात्र देण्यात आले. काही नगरसेवकांचासुद्धा याला विरोध होता. परंतु नागपुरातील एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरून चंद्रपूर मनपाने ही प्रसिद्धीची रोजगार हमी योजना राबविली, असा तिवारी यांचा आरोप आहे. कोरोनाने शहरात हाहाकार माजला असताना रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिनजन, व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका घेण्यास पैसे नाही. त्यामुळे हे कंत्राट तातडीने रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त राजेश मोहीते यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात तिवारी यांच्यासह गोपाल अमृतकर , पप्पू सिद्धीकी, राजू वासेकर, संजय गंपावार यांना समावेश होता.
”कोरोनामुळे शहरात हाहाकार माजला असताना चंद्रपूर मनपाला प्रसिद्धीचा हाव आहे. हे अंत्यत निंदनीय आहे.”
रामू तिवारी
्अध्यक्ष, शहर कॉंग्रेस कमेटी