Divya Nirdhar
Breaking News
ज.वि. पवार
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

खूप झाले राजकीय आरक्षण… ते बंदच झाले पाहिजे…

यवतमाळ : राजकीय आरक्षण बंद व्हावे, असे परखड विचार प्रख्यात विचारवंत ज. वि. पवार यांनी समतापर्वाच्या ऑनलाइन उद्‌घाटन सोहळ्याचे उद्‌घाटक म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचे आहे, या वाक्‍याबद्दल फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेने फक्त राजकीय भूमिकेतूनच विचार केलेला आहे. वास्तविक पाहता शासनकर्ती जमात म्हणजे तुम्हाला मोक्‍याच्या जागेवरती जाऊन बसायचे आहे. त्यामुळे शैक्षणिक क्रांतीच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी केलेले हे महत्त्वपूर्ण विधान आपण समजून घेतले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचे असेल तर निर्णय घेण्याच्या या महत्त्वपूर्ण पातळीवरती आपण यशस्वी व्हायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला शासनकर्ती जमात बनता येईल, असे ज. वि. पवार म्हणाले.

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2005 पासून तर आजतागायत समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने समतापर्वाचे आयोजन यवतमाळ येथे केले जाते. यामध्ये भारतातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारवंतांना आवर्जून मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. यावेळी यवतमाळ येथे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाइन समतापर्वचे आयोजन 9 मे ते 25 मे या दरम्यान केले गेले.
विशेष म्हणजे उद्‌घाटकीय सत्रांमध्ये प्रख्यात विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक व सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य मुंबई ज. वि. पवार यांनी आपले विचार प्रकट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध प्रकारच्या समस्यांवर ती उपाय शोधण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना तुम्हाला भारतीय संविधानाच्या स्वरूपामध्ये प्रदान केल्या आहेत. बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्याबाबत मी सुरुवातीपासूनच आग्रही राहिलो आहे. खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध साहित्याची रेलचेल सध्या संपूर्ण जगामध्ये सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये जगातील सर्वांत महत्त्वपूर्ण आयकॉन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातील. या महामानवाने केलेले अतुलनीय कार्य हे महामानवतावादी विचारधारेचे कार्य होते, त्यामुळेच आज तगायत आपण त्याच विचारधारेवर संघर्ष आणि सम्यक भाषा आत्मसात करून हा प्रवास करीत असल्याचे पवार म्हणाले.
बाबासाहेबांना आलेल्या अनुभवातून ज. वि. पवार यांनी ऑनलाइन समतापर्वाच्या या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार प्रकट करताना त्यांनी सांगितले की, राजकीय आरक्षण बंद व्हायला पाहिजे. कारण आरक्षणाच्या नावावरती निवडून जाऊन महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्यांवर कुठल्याही प्रकारचा आवाज विधानसभेत अथवा संसदेमध्ये उचलला जात नाही. तर राजकीय आरक्षणाच्या भरवशावर इतर महत्त्वपूर्ण घटकांची लोकं संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये पोहचतात. परंतु फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचा लोकांचा पराभव करतात. याचा प्रत्यक्ष अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आल्यानंतर त्यांनी याबाबत निश्‍चितच विचार केला असेल. आता राजकीय आरक्षण संपविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्या शिवाय फुले, शाहू, आंबेडकरवादी व परिवर्तनवादी विचारधारेच्या लोकांना संसदेत अथवा विधानसभेत जाता येणार नाही. त्यामुळे हे आरक्षण संपविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी या व्याख्यानमालेत केले.
यावेळी सर्वप्रथम समतापर्व 2021 च्या अध्यक्ष प्रमोदिनी रामटेके यांनी महापुरुषांना पुष्पमाला अर्पण करून उद्‌घाटकीय सत्राची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष इंजिनिअर मनोहर शहाणे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सहकारी निबंधक रमेश कटके, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, समतापर्वाचे माजी सचिव प्रा. अंकुश वाकडे, दीपक नगराळे, किशोर भगत, अनिल आडे, दिलीप महाले, चित्ररेखा शिरसे (मुंबई), ऍड. रामदास राऊत, डॉ. लीला भेले, राजूदास जाधव, एन. यु .धांदे, मनीषा तीरणकर, घनश्‍याम भारशंकर, यशवंत इंगोले, डॉ. दिलीप घावडे, ऍड. अरुण मोहोड, ऍड. मिलिंद भगत, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अध्यक्ष भाषणाने समतापर्वाच्या या सत्राचा समारोप करण्यात आला. आभार मनवर यांनी मानले.

संबंधित पोस्ट

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

divyanirdhar

म्हसली येथील ग्रामपंचायतीत घोळच घोळ

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेचे लक्ष्यांक वाढवा; राहुल घरडे यांची मागणी

divyanirdhar

आश्चर्य आहे ना! …. त्या आठ गावांनी कोरोनाला टांगले वेशीवर

divyanirdhar

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar

स्थानिकमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंला पुन्हा हुलकावणी?, मोहभंग होण्याची शक्यता

divyanirdhar