Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र काढले

नागपूर : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पक्षाचे कार्यालय, बजाजनगर येथील वासवी लॉन असेल, असे सांगून पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी आधीपासून लावलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे छायाचित्र काढले. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांच्या छायाचित्राचा समावेश आहे. मात्र, शरद पवार यांचा काढण्यात आला नाही.

बजाजनगर येथील पवार यांच्या कार्यालयातून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, दुनेश्वर पेठे यांचे फोटो हटविण्यात आले. नवे फलक बनतील त्यात शरद पवार यांचाही फोटो असेल. पक्षात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येत असून महापालिका निवडणुकीची तयारीही केली जात आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे लवकरच नागपुरात येतील. त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन होईल, असे प्रशांत पवार यावेळी म्हणाले.प्रशांत पवार यांना विदर्भाचे अजित पवार गटाचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, अरविंद भाजीपाले, भागेश्वर फेंडर, राजेश माटे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राजोला जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या विजयासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची एकजूट

divyanirdhar

मागासवर्गीयांवरील अन्यायाविरोधात ‘हल्ला बोल’आंदोलन; नागपूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्लीला रवाना ः जिल्हाध्यक्ष राहुल घरडे

divyanirdhar

डॉ.आंबेडकर बँकेच्या निवडणुकीत समता पॅनल विजयी

divyanirdhar

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर

divyanirdhar

राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ जुलै रोजी निर्दशने

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar