चंद्रपूर : भद्रावती येथील एका व्यक्तीने टाकळी परिसरातील शेतजमिनीवर हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सहायक संचालक नगर रचना शाखा चंद्रपूर येथे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. त्यानंतर सहायक नगर रचनाकार अनिल चहांदे यांनी या कामासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर दहा हजार रुपयांत सौदा झाला.
शेतजमिनीवर हॉटेल व रेस्टॉरंट बांधकामाच्या परवानगीसाठी 50 हजार रुपयांची मागणी सहायक नगर रचनाकारास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. अनिल श्रावण चहांदे असे लाचखोर सहायक नगर रचनाकाराचे नाव आहे.याप्रकरणाची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर पडताळणीत सहायक नगर रचनाकार अनिल चहांदे यांनी 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 28 मे रोजी पंचासमक्ष सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, मनोहर एकोणकर, संतोष येलपूलवार, अजय बागेसर, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, समीक्षा ढेंगळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.