Divya Nirdhar
Breaking News
गुन्हाठळक बातम्यानागपूरमुंबईविदर्भ

‘ब्लू टीक’च्या नादात होईल घात; फेसबुक, इन्स्टावर दलाल सक्रिय

नागपूर : सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाऊंटला ब्लू टीक मिळणे संबंधितांसाठी मानाचे समजले जात आहे. फेसबुक किंवा इन्स्टावरील फालोअर्ससह सातत्याने समाजहिताच्या पोस्ट, लेखन आदी करणारे यूजर्स पात्र ठरतात. परंतु, हे ब्लू टीक मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्या मदतीने ब्लू टीक मिळविण्याचा प्रयत्न केल्यास कायमस्वरूपी ब्लॉक होण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक वयोगटातील व्यक्ती कुठल्याही माहितीसाठी, मनोरंजनासाठी फेसबुक, इन्स्टावर निर्भर झाल्याचे चित्र आहे. यात व्यावसायिक, राजकीय नेते व प्रोफेशनल युजरचाही समावेश आहे. आता फेसबुकतर्फे दिल्या ‘ब्लू टीक’ची भर पडली आहे. ही ब्लू टीक मिळविणे सोशल मीडिया यूजरसाठी मानाचे समजले जात असल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले.
ब्लू टीक मिळविण्यासाठी फेसबुकच्या नियमानुसार नियमित चांगल्या, समाजहिताच्या पोस्ट, लेखनात सातत्य, मोठ्या प्रमाणात असलेले फालोअर्स, त्यांच्याकडून मिळणारी दाद, हेच यूजर ब्लू टीक मिळवण्यासाठी पात्र ठरतात. परंतु, अलीकडे ब्लू टीक मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावरील दलाल सक्रिय झाले आहेत. हे दलाल कमी वेळात ब्लू टीक मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या यूजर्स ३० हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम घेत असल्याचे समजते.
देशभरातील ऑनलाइन इंग्लिश पोर्टल्सवर लिखाण प्रकाशित करू असे सांगून दलाल यूजर्सचे लॉगिन, पासवर्डही मागतात. विकिपीडियाची माहिती, इमेल मागितल्यानंतर ते कामाची रक्कम ॲडव्हांसमध्ये मागतात. पात्र नसतानाही ‘ब्लू टीक मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यात मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील व्यक्ती राजकीय किंवा मोठा व्यावसायिक असल्यास त्याच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो. शिवाय आर्थिक लूटही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दलालांकडून मदत घेणे भोवणार
पात्र नसताना ब्लू टीक मिळवून दिल्याचे दलालाला माहिती असते. हेच दलाल यूजर्सला ब्लॅक मेल करून पुन्हा त्याच्याकडून पैसे उकळू शकतात. एखादवेळी यूजर्सने पैसे न दिल्यास हे दलाल फेसबुकला यूजर्सबाबत माहिती देऊ शकतात. त्यामुळे यूजर्स फेसबुकवरून कायमचा ब्लॉक होऊ शकतो. ‘ब्लू टीक’ मिळवण्यासाठी यूजर्सने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविणे, ऑनलाइन जनसंपर्क वाढविणे ही सोपी पद्धत आहे. फेसबुकचा फॉर्म ऑनलाइन भरून द्यावा लागतो. धार्मिक, अतिरेकी विषयांची पोस्ट प्रोफाइलीमध्ये असल्यास ‘ब्लू टीक’ मिळत नाही. कोणतीही सोशल मीडिया कंपनी ऑफर देत नाही. इमेल व मेसेज करीत नाही. त्यामुळे यूजर्सने दलालांच्या नादी लागून प्रतिष्ठा गमावू नये.

संबंधित पोस्ट

शिक्षण सभापतीने घेतल्या अधिकच्या सायकली, जि.प.अध्यक्षही गोत्यात

divyanirdhar

आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कुहीत धरणे आंदोलन; प्रमोद घरडे यांच्या पाठिंब्याने आंदोलनाला बळ

divyanirdhar

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी;‘कॅग’प्रमाणेच सरकारच्या समितीचेही त्रुटींवर बोट

divyanirdhar

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर

divyanirdhar

भाजप केला आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

divyanirdhar

विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना; परीक्षा अर्ज अडवू नका

divyanirdhar