Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरविदर्भ

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

नागपूर ः माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करण्यात आला. शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले.

 माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनामुळे राज्यातील रक्त साठ्यावर परिणाम होऊन तो कमी झाला कमी झालेला रक्तसाठा भरून काढण्यासाठी व रक्तदान हे महान दान हे ब्रीद मनाशी बाळगून माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो प्रौढ,महिला व युवक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, अनिल अहिरकर, दिलीप पनकुले, बजरंगसिंग परिहार, राकॉंपा कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष येजेन्द्र ठाकूर,जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, रवींद्र इटकेलवार, जाणबा मस्के, जि.प.महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, हिंगणा कृ.ऊ.बा.स. सभापती बबनराव आव्हाळे, हिंगणा प.स. सभापती सुषमा कावळे, प.स. नागपूर उपसभापती संजय चिकटे, माजी जि.प.सदस्य सुचित्रा ठाकरे,विठ्ठल कोहाड , शिवसेनेचे विलास भोंबले, रिजवान अन्सारी,राकॉंपा हिंगणा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,राकॉंपा नागपूर तालुकाध्यक्ष संजय कुंटे,राकापा युवक तालुकाध्यक्ष आशिष पुंड, विनोद ठाकरे,राकापा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, प.स. सदस्य सुनील बोंदाडे, अनुसया सोनवाने, पोर्णीमा दिक्षित,आकाश रंगारी,सरपंच प्रेमलाल भलावी, रवींद्र आदमने, दिनेश ढेंगरे, निलेश उईके, योगेश सातपुते,नगरसेवक संकेत दीक्षित,प्रदीप चंदेल,दामोधर गुजर, धीरज हांडे,राजू गोतमारे,सुशील दीक्षित, हनुमंत दुधबळे, बंडू बोन्डे,युवराज पुंड, देवराव मसराम,दीपक वर्मा,प्रमोद फुलकर, गुणवंता चामाटे, मीनाक्षी ढोले,गोवर्धन प्रधान, बाबुराव येळणे,मुकेश कथलकर, फिरोज शेटे, नाना शिंगारे,लीलाधर दाभे,नरेश नरड,मंगेश सबाने,दीपावली कोहाड, मीनाताई मेश्राम,गुलाबचंद हरिनखेडे,प्रभाकर लेकुरवाळे,फिरोज शेख आदी उपस्थित होते. रक्त संकलन करण्याचे काम जीवनज्योती ब्लड बँक नागपूर यांनी केले.

संबंधित पोस्ट

हे काय… 60 हजार खुराकीसाठी अपुरे

divyanirdhar

कॉंग्रेस नेत्यांना रामटेकमध्ये बौद्धांची ‘एलर्जी’

divyanirdhar

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या कारभाराची चौकशी करा; आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदागवळी यांची मागणी

divyanirdhar

रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम मागासवर्गातील युवकांना देतोय ऍथलेटिक होण्याचे मोफत धडे !

divyanirdhar

पदोन्नतीतील आरक्षण समितीला मुदतवाढ म्हणजे शासनाचे वेळकाढूपणाचे धोरण; शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांचा घणाघात

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar