Divya Nirdhar
Breaking News
sarita gakhare
नागपूरराजकीयविदर्भ

वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांना मिळाली कामाची पावती, पदभरतीस मिळाली मान्यता

दिव्यनिर्धार/ जिल्हा प्रतिनिधी

वर्धा: नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदभरतीस शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जिप उपाध्यक्ष वैशाली येरावार यांनी 7 रोजी भर उन्ह आणि मुसळधार पावसात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण केले होते. आपल्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने पदभरतीचा अध्यादेश काल रात्री 9 वाजता काढला. आंदोलनामुळे राज्यासह वर्धा जिल्ह्यातील नारा, कोरा, वायगाव (नि.) येथील रुग्णालयातील पदभरतीचा मार्ग सुकर झाल्याची माहिती जिपच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांनी जिपत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 जिप अध्यक्ष सरिता गाखरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या कारंजा तालुक्यातील नारा, समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदभरतीस शासनाने मंजुरी देण्यात यावी यासाठी आपण 6 जानेवारी 2020 रोजी प्रथम निवेदन दिले. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी शासनाला स्मरणपत्रही दिले. या मागणी संदर्भात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते, जिल्हाधिकारी आदींसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, मागणी मान्य न झाल्याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा दिला होता. कारंजा तालुक्यातील नारा व समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी सुसज्ज अशा इमारती आहेत. परंतु, प्राथमिक आरोग्य केद्रासाठी पद भरती करण्याकरिता शासन स्तरावरून अद्याप मंजुरी न मिळाल्यामुळे या मजुरी देण्यात यावी अशी आपली मागणी होती, असे त्यांनी सांगितले.

 कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने त्वरित दखल घेतल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील पदभरतीचा विषय निकाली लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सांभाळणे शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला जिप उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती विजय आगलावे, आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना; परीक्षा अर्ज अडवू नका

divyanirdhar

नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा हुकुमशाह…विरोधकांचा आरोप

divyanirdhar

गडचिरोलीत साकारला “जितेंगे हम”

divyanirdhar

महापौर चषकात घोटाळा : लेखा परीक्षण अहवाल, कंचर्लावार यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

तो आपला घात करेल’…पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

divyanirdhar