



नागपूर : चांगले काम करण्याची इच्छा मनात असेल तर काही साध्य करता येते. जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी नागपूर जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याची माहिती दिली. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार असताना सीईओ आणि त्यांच्या टीमने या गावात लसीकरण साध्य केले. त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गंत पहिल्या टप्प्यात ४५ वयोगटापेक्षा जास्त नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेंतर्गंत गावनिहाय पथके तयार करण्यात आली असल्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेल्या १३ गावांमध्ये हिंगणा तालुक्यातील देवळी (पेठ) व टाकळघाट या दोन गावांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव, काटोल तालुक्यातील गोंडीखापा, खापा, घुबडी, कावडीमेट, मोहगाव (ढोले) या पाच गावांचा समावेश आहे. कुही तालुक्यातील तारणी व पवनी ही दोन गावे, नरखेड तालुक्यातील परसोडी दीक्षित व रानवाडी अशी दोन गावे तर सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) या गावांचा समावेश असल्याची माहिती कुंभेजकर यांनी दिली. कोविड १९ च्या लसीकरण मोहिमेंतर्गंत जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे १३3 गावांमध्ये शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांनी दिली.