Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमुंबईराजकीयविदर्भ

राष्ट्रवादीत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंनी ही घेतली जबाबदारी…

राजकीय प्रतिनिधी/ दिव्य निर्धार

नागपूर ः युवकांपासून तर वृद्धापर्यंत सर्वांना आपले करणारे सुुुबोध मोहिते  यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संघटनाचा विडा उचलला आहे. राष्ट्रवादीचे गावागावांत संघटन उभे करून पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागपूर येथे राष्ट्रवादीचा मेळावा माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची उपस्थिती होती. सुबोध मोहिते यांनी नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. त्यानंतर नागपूर येथील मेळाव्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना उत्तर देताना त्यांनी विदर्भातील संघटनावर भर दिला. विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजूर करण्याचा त्यांनी विडा उचलल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे व त्याकरिता ‘गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस हा नारा’ देण्याची गरज आहे. त्याकरिता आपण स्वत: प्रयत्नशील राहून विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबर वर आणणार, असे वचन माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्याबाबत नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्लजी पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार, प्रवीण कुंटे ,राजू राऊत, अर्चना हरडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मोहिते म्हणाले की पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी गरिबांच्या, शेतकऱ्यांचा प्रत्येक कामात धावून गेले पाहिजे. त्यांच्या अडचणीत जर योग्य प्रकारे मदत केली तर पक्ष संघटना वाढीसाठी मदत होईल, पक्ष संघटना वाढेल. आपल्या सोबत प्रफुल्ल पटेल सारखे नेते आहेत. मी स्वतः सुद्धा आपल्यासोबत सदैव राहील व आपल्या सोबतीने पक्ष संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विदर्भात एक नंबरचा पक्ष करू, असे मोहिते यावेळी म्हणाले.

संबंधित पोस्ट

मंत्री वडेट्टीवारांचा अजून एक गोंधळ निस्तरा : डॉ. बंग

divyanirdhar

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी;‘कॅग’प्रमाणेच सरकारच्या समितीचेही त्रुटींवर बोट

divyanirdhar

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar

रिपब्लिकन विचारधारा स्वीकार करे : डा मोहनलाल पाटील

divyanirdhar

कृषीमालाचे गुणात्मक उत्पादन गरजेचे : नितीन गडकरी

divyanirdhar