प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
नागपूर ः येथील सेवा फाउंडेशनच्या वतीने चंदनशेष नगर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हुडकेश्वर आणि नरसाळा परिसरात १ हजार १११ झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
हुडकेश्वर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप व सेवा फाउंडेशनवतीने चंदनशेषनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या संस्थेच्या सहकार्यातून हुडकेश्वर-नरसाळा संपूर्ण परिसरात १ हजार १११ झाडे लावण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात भाजपा नागपूर शहर अध्यक्ष व आमदार प्रवीणजी दटके यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अजय बोढारे, डी. डी. सोनटक्के व डॉ. प्रितीताई मानमोडे यांनी केले. याप्रसंगी नगरसेवक भगवान मेढे, नगरसेविका स्वाती आखतकर,नगरसेविका लीला हातीबेड, भाजपा नागपूर तालुका अध्यक्ष सुनील कोडे, हुडकेश्वर नरसाळा प्रभाग २९ चे अध्यक्ष मनोज लक्षणे,चंदू आखतकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य अभिजित वाघ यांनी केले. तर सहकार्य कपिल आदमने, पिंटू बाळसकर, नितीन वैद्य, सचिन जोध, किशोर कुंभारे, दीपक वाघमारे,
गोपाल ढोणे, संजय डाळीमकर, दिनेशजी सिसोदिया, प्रणय भदाडे, रजनी गुरपूडे, शिवाली वडाळकर, माधुरी बेलसरे, विश्वास अकर्ते, प्रमोद ढोमणे,रामकृष्ण हलबे, वामन भोंडवे, सुनील खरोले, शुभम डांगे, अक्षय डांगे, अमोल भागवतकर,श्री.निंबारते, नभा डांगे, वृषाली वाघ, प्रणीता ढोमणे, रिया ढोमणे यांनी केले.