Divya Nirdhar
Breaking News
modi
आंतरराष्ट्रीयठळक बातम्यानागपूरमुंबईराजकीयराष्ट्रीयविदर्भ

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करणार – पंतप्रधान

प्रतिनिधी/दिव्यनिर्धार

नवी दिल्ली : भारत जागतिक हवामान बदलासाठी तयार असून इथेनॉलचा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादा दरम्यान केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही कार्यक्रमाची थीम होती.
नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही 250 पटींहून अधिक झाली असून सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास 15 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाबद्दल भारत जागरुक असून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेने काम करत आहे.
ते पुढे म्हणाले कि, इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रीत करत असून इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्याने त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे. देशभरात इथेनॉलच्या उत्पादनाशी आणि वितरणाशी संबंधित महत्वाकांक्षी पायलट प्रोजेक्टची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

स्थानिकमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंला पुन्हा हुलकावणी?, मोहभंग होण्याची शक्यता

divyanirdhar

डॉ.आंबेडकर बँकेच्या निवडणुकीत समता पॅनल विजयी

divyanirdhar

पावसाचा फटका : मालाड भागात चार मजली इमारतीचा भाग कोसळून 11 ठार

divyanirdhar

मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

divyanirdhar

खासदार मेंढे म्हणाले, ग्रामीण भागात तयार करा रोजगार 

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar