Divya Nirdhar
Breaking News
shetkari
आंतरराष्ट्रीयठळक बातम्यामुंबईराजकीयराष्ट्रीय

शेतकरी आंदोलन होणार अधिक आक्रमक, शेतकरी नेत्यांची घेतली ममतांची भेट

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
दिल्ली: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यामध्ये भेट घेतली. या बैठकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी शेती आणि स्थानिक शेतकऱ्यांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, एकीकडे उद्योगांचे हाल होत असून दुसरीकडे औषधांवर देखील जीएसटी लावला जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी बोलण्याची देखील तसदी घेतली नाहीये. मी अशी मागणी करतेय की हे तीनही कृषी कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत.

सुधारित तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संतप्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असून देखील मोदी सरकारने हे कायदे मागे घेतलेले नाहीयेत. या कायद्यांवरुन आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र तरिही समाधानकारक असा तोडगा निघाला नाहीये. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली असताना देखील हे आंदोलन आजही सुरुच आहे. या आंदोलनात आतापर्यंत अनेक आंदोलकांनी आपला जीव गमावला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आलेली असताना या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील शेतकरी आंदोलकांकडून केले जात आहेत

यावेळी राकेश टिकैत यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, त्यांचा या शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा कायम आहे. पश्चिम बंगाल एक मॉडेल स्टेट म्हणून काम करेल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा करवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल.
शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत, मात्र या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या ट्विटरवर म्हटलंय की, शेतकरी आंदोलनाचे सहा महिने पूर्ण करणं तितकसं सोपं नव्हतं. मोदी सरकारच्या अहंकारी आणि निर्दयी वागणुकीमुळे या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे आंदोलक शेतकरी आपला होऊपर्यंत ठामपणे उभे राहितील. अशा आशयाचे ट्विट किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून सरकारविरोधातील शेतकऱ्यांच्या या मागणीला कृतीशील पाठिंबा दाखवला आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात. याच संदर्भात आता राहुल गांधी यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, शेती आणि देशाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आपले प्राण गमावले आहेत. मात्र, शेतकरी घाबरले नाहीयेत. ते आजही तितक्याच ठामपणे खरेपणाने उभे आहेत.

संबंधित पोस्ट

तीन वर्ष सांभाळले, शेवटी वनविभागानेच पकडले!

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ः महाविद्यालयावर कारवाईची राष्ट्रवादीच्या नेत्या सोनम उके यांची मागणी

divyanirdhar

खूप झाले राजकीय आरक्षण… ते बंदच झाले पाहिजे…

divyanirdhar

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

रामदास आठवले यांच्या वक्त्याचा राजानंद कावळे यांच्याकडून निषेध; धम्मात राजकारण करून वातावरण बिघडविण्याचा आठवलेचा प्रयत्न

divyanirdhar