Divya Nirdhar
Breaking News
गुन्हानागपूरविदर्भ

चंद्रपुरात तस्कराने तोडले रेल्वे फाटक…

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू आहे. मंगळवारी रात्री अवैध रेतीची तस्करी करणार्‍या ट्रॅक्टर चालकाने समोरील एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला जबर धडक मारली. ही धडक जोरदार असल्याने फाटकाचे दोन तुकडे झाले.
अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे. पण येथील महसूल प्रशासनासह पोलिस विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. हे रेल्वे फाटक पोलिस ठाण्याच्या अगदी समोर आहे. पण, रेती तस्करीला त्यांची मुकसंमती असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाल्याने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर लावलेले सिसिटीव्ही कॅमेरे आता शोभेची वास्तू झाल्याचे दिसून येते.  मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घुससह वरोडा, पोंभूर्णा येथे धाडसत्र राबवून अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले. तशीच कार्यवाही पुन्हा एकदा घुग्घुस परिसरात राबवावी, अशी मागणीही आता नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित पोस्ट

ह्युमँनिटी सोशल फाउंडेशन धावली विद्यार्थिनीच्या मदतीला; ऑनलाइन शिक्षणासाठी दिला मोबाईल भेट

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar

बदली रद्दच्या आदेशाने ग्रामसेवकांत नाराजी; आदेश मागे घेण्याची ग्रामसेवक संघाची मागणी

divyanirdhar

माजी मंत्री बंग यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद उमेदवारांनी राष्ट्रवादीतर्फे भरले अर्ज

divyanirdhar

ग़डचिरोली: लसीकरणासाठी मंत्री वडेट्टीवार आग्रही, काय म्हणाले वाचा…

divyanirdhar

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

divyanirdhar