Divya Nirdhar
Breaking News
jitendra ghodeswar
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीय

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीरामजी यांची कॉपी केली : नवनियुक्त बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार

सुजित ठमके/ दिव्यनिर्धार प्रतिनिधी
नागपूर – नागपूर महानगर पालिकेच्या बीएसपी गटनेते पदी जितेंद्र घोडेस्वार यांची बसपा प्रदेश कार्यकारिणीने निवड केली आहे. ६ महिन्यानंतर महानगर पालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. नागपूर महानगर पालिकेवर समविचारी पक्षांशी युती करून सत्ता काबीज करण्याकरिता बीएसपी ने वरिष्ठ स्तरावर हि स्ट्रॅटेजि आखल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच प्रदेश कार्यकारिणीने केंद्रीय कार्यकारिणीच्या सांगण्यावरून जितेंद्र घोडेस्वार यांची गटनेते पदी नियुक्ती केल्याचे भाकीत आहे. जितेंद्र घोडेस्वार यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. अभ्यासू आहेत. पक्ष बांधणीचा अनुभव दांडगा आहे. पक्षाशी त्यांची नाळ अनेक वर्षांपासून घट्ट आहे. त्यांची नियुक्ती पक्षाला उभारी देईल असे बोलल्या जाते. बीएसपी ला नव्या दमाने आणि जोमाने उभे करणे, पक्ष वाढविण्याकरिता स्ट्रॅटेजि आखणे, निवडणुकीकरिता नियोजन आखणे आणि विविध विषयांवर जितेंद्र घोडेस्वार यांनी या निमित्याने दिव्य निर्धार चे सिनिअर एडिटर सुजित ठमके यांना प्रकट मुलाखत दिली. मुलाखातीत घोडेस्वार यांनी आपला घोडा चौफेर उधळला. केंद्र सरकार ची धोरणे दलित, आदिवासी, बहुजन, शेतकरी समुदायाविरोधात कशी आहेत त्यावरही त्यांनी भरभरून भाष्य केले.

प्रश्न – केंद्र सरकारची धोरणे मुळात बहुजन विरोधी आहेत असे बोलल्या जाते ते कसे ?
घोडेस्वार – शेतकरी कायदा, सार्वजनिक बँक खाजगीकरण, फायद्याआतील पीएसयू ना उदयॊगपतींना विकणे इत्यादी हि सगळी धोरणे बहुजन विरोधी आहेत. आगामी निवडणुकीत याचा जोरदार फटका भाजपाला बसेल. कोरोना ची परिस्थिती सुद्धा हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दुसरा लाटेत मोठ्या प्रमाणात झालेले मृत्य हे केंद्र सरकार च्या नियोजन शून्य त्याचा परिपाक आहे.
प्रश्न – बीएसपी चा प्रभाव राज्यात हल्ली ओसरलाय नेमके कारण काय असावे ?
घोडेस्वार – बसपाचा प्रभाव ओसरला हे म्हणणे चुकीचे आहे. मुळात बसपा हा राजकीय पक्ष जरी असला तरी एक कॅडर बेस्ड संगठन आहे. त्यामुळे राजकीय नैराश्य येणे म्हणजे प्रभाव ओसरने होत नाही. कोरोना मुळे थोडे थांबून आहोत पण लवकरच पक्ष जोमाने वाढविण्याकरिता कार्यकर्ते कामाला लागतील.
प्रश्न – वंचित बहुजन चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीराम यांचीच कॉपी केलीय असे तुम्हाला वाटते काय ?
घोडेस्वार – होय…. मा. कांशीराम यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी दलित, आदिवासी, शेतकरी, बहुजन समाजाची संकल्पना मांडली. वर्ष १९८४ मध्ये जो विचार मा . कांशीराम यांनी रुजविला तोच विचार आज ऍड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने मांडत आहेत. मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हि संकल्पनाच प्रजासत्ताक पक्ष अशी होती. मा. कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टी ची घडी बसविली तोच प्रयोग आज ऍड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या निमित्याने करीत आहेत. हा कॉपी करण्याचा प्रकार आहे.परंतु त्यांचे सेटलमेंट चे राजकारण सगळ्यांना माहिती आहे. बहुजन समाज दुधखुळा नाही त्यांना फारसी दाद देणार नाही.
प्रश्न – आगामी महानगर पालिका निवडणुका जवळ येत आहेत. पक्ष निद्रानाश अवस्थेत आहे. मरगळ कशी झटकणार ? काय नियोजन आहे ?
घोडेस्वार – निवडणुकीकरिता कार्यकर्ते, पदाधिकारी सगळी नेते मंडळी कामाला लागली आहेत. नागपूर महानगर पालिके संदर्भात बोलायचे झाले तर आगामी काळात काँग्रेस, भाजपा सोडून जर छोटे छोटे फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांना मानणारे पक्ष असतील आणि त्यांनी आमच्याशी सामंजस्यांची भूमिका घेतली तर निश्चितच युती करण्या संदर्भात विचार करू. नागपुरात आमचे चांगले प्राबल्य आहे. मागील महानगर पालिका निवडणुकीत आमचे 40 उमेदवार दुसरा क्रमांकावर होते.आणि फारच अल्प फरकांनी ते हरले. या निवडणुकीत पक्ष ताकतीनिशी उतरेल. समविचारी पक्षांना सोबत घेऊन नागपूर महानगर पालिकेची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करू त्या दृष्टीने सगळी रणनीती आखणे सुरु आहे.
प्रश्न – हे तुमचे विश्लेषण झाले पण जर त्रिशंकू असल्यास काय स्टॅन्ड राहील ?
घोडेस्वार – जर तशी स्थिती राहिली तर वेळेनुसार निर्णय घेण्यास प्रदेश कार्यकारिणी सक्षम आहे.
प्रश्न – उपमहापौर पदाची ऑफर पक्षाला भाजपाने दिली होती नेमकं काय आहे ?
घोडेस्वार – होय…. उपमहापौर पदाची ऑफर भाजपाने दिली होती परंतु उत्तर प्रदेश मधील कडवे अनुभव लक्षात घेता आणि आमच्या पक्षाची विचारधारा लक्षात घेता हि ऑफर आम्ही नाकारली. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही मनूवादी विचारधारा जोपासणारे आहेत. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर आणि मा . कांशीराम यांच्या विचारधारेला मानणाराच पक्षाची युती करू हि निश्चित. आगामी नागपूर महानगर पालिका काबीज करणे हेच आमचे मुख्य लक्ष आहे.

संबंधित पोस्ट

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या दौऱ्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह

divyanirdhar

`मजीप्रा` च्या कर्मचार्‍यांचे काळ्याफिती लावून काम

divyanirdhar

मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

divyanirdhar

“अर्थव्यवस्थे’चा भार मद्यपींच्या खांद्यावर, लाखोंची ढोसली दारू

divyanirdhar

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar

सरकारच्या दबावामुळेच मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

divyanirdhar