



नागपूर ः केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व इतर इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्या कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात गोधनी रेल्वे पेट्रोलपंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाची निषेध करण्यात आला. सरपंच दीपक राऊत यांना ही दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, घरगुती गॅस सिलिंडर आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात घंटा वाजवून व रामदेव बाबा यांना झुला झुलवून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. गोधनी जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्त्यांनी गोधनी पेट्रोल पंपासमोर सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी गोधनी ग्रामपंचायत सरपंच दीपक राऊत, ज्योती राऊत, रुपालीताई मनोहर, राहुल मनोहर, अरुण राऊत, राजेश महाजन, सचिन राऊत, शीतल महानंदी, रोहिणी खोरगडे, रवी राऊत, रोशन घोडमारे, रीनाताई वर्गीस, सुचिता गज्जलवार, जयश्री टाकरखेडे, दिनेश राऊत, राजेश हेलोंढे, योगेश सरोदे, येवले मामा, अनिल चिमोटे, जयराम सरोदे उपस्थित होते.