Divya Nirdhar
Breaking News
नागपूरमुंबईविदर्भ

का केला वाघाने विशेष पथकावरच वाघाचा हल्ला… वाचा

प्रतिनिधी /दिव्यनिर्धार

 

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील नागरिस त्रस्त झाले आहे. कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना घडत आहे. आता चक्क विशेष पथकावर वाघाने हल्ला करून डॉक्टरला जखमी केले आहे. त्यामुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. माणसे कमी वाघ जास्त, अशी चंद्रपूल जिल्ह्याची ओळख होत आहे.

निपचित पडून असलेल्या वाघाने गस्तीवर असलेल्या विशेष पथकावर अचानक हल्ला चढवला. यात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी झाले. रवी खोब्रागडे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या दोन्ही पायाची बोटे गंभीररित्या जखमी झाली. .ही घटना मूल बफर झोन अंतर्गत येणाऱ्या डोणी गावालगतच्या जंगलात घडली. पथकावरच वाघाने हल्ला चढविल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाघाच्या वाढत्या हल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात असणाऱ्या वाघ आणि बिबट हे संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यास अशा प्राण्यांवर पाळत ठेवण्यात यावे, अशा सूचना वनविभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील डोनी गावालगतच्या जंगलात एक वाघ निपचित अवस्थेत पडून असल्याची माहिती पथकाला मिळाली. मागील काही दिवसांपासून ताडोबा येथील प्रकल्पाचे पथक या वाघावर पाळत ठेवून होते. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान वाघाची प्रत्यक्ष स्थिती बघण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पथक गेले. तेव्हा वाघाने अचानक हल्ला चढवला. स्वतःचा बचाव करताना खोब्रागडे खाली पडले. तेव्हा वाघाने त्यांचे दोन्ही पाय पकडले. तोंडाने एका पायावर हल्ला चढविला, तर दुसरा पाय त्याने पंजामध्ये पकडला. पायात मजबूत बूट असतानादेखील जबड्यात बोटे सापडले. त्यात खोब्रागडे यांच्या पायाचे एक बोट तुटले तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सोबतच्या पथकाच्या लोकांनी जोरदार आरडाओरडा केल्यावर वाघाने पळ काढला. दरम्यान, जखमी डॉक्टरला शस्त्रक्रियेसाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. या घटनेला मूल येथील बफर झोनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पथकावरच वाघाने हल्ला चढविल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे

संबंधित पोस्ट

खूप झाले राजकीय आरक्षण… ते बंदच झाले पाहिजे…

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

साडे सहा लाख बौद्ध मतदारांचे नेतृत्व करणाऱ्या किशोर गजभियेंवर अन्याय

divyanirdhar

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

divyanirdhar

divyanirdhar

प्रथमच दिव्यांगाकरिता घरकुल योजना; ५२ दिव्यांगांना घरकुलाचा लाभ ः जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांची माहिती

divyanirdhar