प्रतिनिधी/दिव्य निर्धार
नागपूर ः महिलांना ३० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण आहे. मात्र, त्याचा लाभ त्या महिलांना मिळतो हे सध्या तरी सांगता येेत नाही. मात्र, त्यांच्या पदराआड पतीच राजकारण करीत असल्याचा आरोपप्रत्योरा झाले आहे. तेच आरोपप्रत्योरोप मौदा नगराध्यक्षाच्या संदर्भात आहेत. चर्चा मात्र हस्तक्षेपाची शहरभर सुरू आहे.
वार्ड क्र.10 ते 14 येथे नागरिकांच्या लेखी तक्रारी मासिक सभेत चर्चा करून मार्ग काढण्याऐवजी त्यावर राजकारण सुरू आहे. त्याचा परिणाम नागरिकांची गैरसोय होते आहे. याबाबत लेखी तक्रार नागरिकांनी मुख्याधिकारी यांना केली. समस्येच्या निराकरणाबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक शिवराज माथुरकर यांना विनंती केली. नगसेवक यांनी सदर विषय मासिक सभेत चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. पण विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे विषय मासिक सभेतून वगळण्यात येतात, असा विरोधा पक्षातील नगरसेवकांचा आरोप आहे. ज्यातून समस्या मार्गी लागत नाहीत. नगराध्यक्ष एकही काम करत नाही, पण इतर सदस्यांच्या कामात अडथळे निर्माण करतात, अशी टीका नगरसेवक शिवराज माथुरकर यांनी केली. यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा शिवराज माथुरकर यांनी दिला आहे.