Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यामुंबईराजकीयविदर्भ

बार्टी कार्यालय कुलुप बंदः  अनेक योजना रखडल्या आंदोलन करण्याचा इशारा

उल्हास मेश्राम : दिव्य निर्धार प्रतिनिधी

साळवा :  डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे नागपूर येथील कार्यालयाला कुलूप असल्यामुळे नागपूर येथील कार्यालय बंद करण्यात आले की काय? असा प्रश्न ईच्छुक लाभार्थाकडून केला जात आहे. युती शासनाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी )पुर्ण येथे असलेल्या मुख्य कार्यालयाने संस्थेचे विकेंद्रीकरण करून नागपूर येथे केले होते.

परंतु महाविकास आघाडीचे सरकार येताच या विभागाचे मुख्य सचिव संचालक यांनी नागपूर येथील कार्यालयाकडे संपूर्णतः दुर्लेक्ष केलेले आहे.त्यामुळे बार्टीमार्फत अनुसूचित जा,ती नवबौद्ध घटकातील नागरिकांकरिता व विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार्‍या विविध योजनेचे प्रस्ताव रखडलेले आहेत.

सामाजिक न्याय मंत्री धनजय मुंडे यांनी शालांत परीक्षेत 90 टक्के पेक्षा गुण जास्त करणार्‍या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले असले तरी ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार असल्यामुळे तसेच नागपूर येथील कार्यालय बंद असल्यामुळे या योजनेचे पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांना या कार्यालयात आल्या पावती मागे फिरावे लागत आहेत.

सामाजिक न्याय  विभागाने सहआयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना याबाबत विचारले असता त्यांनी बार्टी कार्यालयात एक कर्मचारी असून त्यांच्या मनात येईल, तेव्हा तो कार्यालयात येत असतो व जात असतो. बार्टीच्या कार्यालय आमच्या अखर्‍यारित येत नसल्याचे सांगितले. बार्टीचे संचालक धम्मजोती गजभिये यांना याबाबत दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या बाबत सामाजिक न्याय मंत्री धनजय मुंडे यांना निवेदन पाठवून ही गंभीर बाब लक्षात आणून दिली आहे. हे कार्यालय पुर्ववत सुरू करून या विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनेची प्रभावीपणे अंमल बजावणी करावी व त्याकरिता आवश्यक असलेल्या मनुष्य बळाची निर्मिती करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे केली आहे.

संबंधित पोस्ट

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

राणे गरजले.. कोरोनातही मलिंदा खाणारे हे भ्रष्ट सरकार

divyanirdhar

मनपाच्या लाचखोर लिपिकाला अटक; १० हजारांची मागितली लाच

divyanirdhar

बार्टीच्या योजना बंद नाहीच; सचिव भांगेंना बदनाम करण्याचे षडयंत्र

divyanirdhar

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट केल्यास देऊ चोप; आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे अध्यक्ष आर. एल. नंदागवळी यांचा इशारा

divyanirdhar