Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

असंघटितांसाठी कामगार संघटनांनी एकसंध व्हावे ः सुभाष लोमटे

दिव्य निर्धार ः प्रतिनिधी

 नागपूर ः ९३ टक्के असंघटित श्रमिकांना संघटित केल्याशिवाय संघटित श्रमिकांना न्याय मिळणार नाही. देशात शेतमजूर,बांधकाम मजूर,घरेलू कामगार, कंत्राटी कामगार व सर्व असुरक्षित कामगारांची परिस्थिती फार कठीण होत चालली आहे. केंद्र व राज्य सरकार असंघटित श्रमिक वाढवत आहे. कामाचे तास निश्चित नाहीत ,वेतन वाढ नाही, वेतन नाही. आरोग्य सुविधा नाहीत, सामाजिक सुरक्षा नाही. संघटित क्षेत्रांनी असंघटित क्षेत्राकडे दुर्लक्ष केले म्हणून असंघटित क्षेत्रातील श्रमिकाला संघटित केल्याशिवाय संघटित श्रमिकाला न्याय मिळणार नसल्याचे औरंगाबादचे सुभाष लोमटे यांनी उद्घाटनीय भाषणात सांगितले.

अध्यक्षस्थानी अशोक थुल होते. प्रमुख पाहुणे अशोक दगडे, राजू भिसे ,दिलीप देशपांडे, श्याम काळे ,गुरप्रीतसिंग होते. प्रास्तविक विलास भोंगाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन सुजाता भोंगाडे यांनी केले. मनीषा शहारे, अस्मिता साखरे,मंगला मेश्राम यांनी गीत सादर केले. असंघटित श्रमिक काल आज आणि उद्या या विषयावर श्याम काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात जननी श्रीधर, कांता मदामे, माया ढाकणे, मनीषा शहारे, राजू भिसे,सतीश तलवारकर, समीक्षा गणवीर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र व राज्य सरकारचे धोरण व कायदे यावरही चर्चा झाली. डॉ हरीश धुरट, डॉ श्रीनिवास खांदेवाले यांनी कामगार संघटनांच्या भूमिकेवर विचार व्यक्त केले. घरकामगार ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, शेतमजूर ,बांधकामगार ,वनकामगार ,परिचारिका प्रामुख्याने उपस्थित होत्या. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कामगार संघटना संयुक्त कृती समिती,अंगणवाडी कर्मचारी सभा ,विदर्भ मोलकरीण संघटना ,कस्टकरी जन आंदोलन ,सिटू आयटक व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनानी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. आभार विलास भोंगाडे यांनी मानले.

संबंधित पोस्ट

कसे झाले साध्य; नागपूर जिल्ह्यात १३३ गावांत शंभर टक्के लसीकरण

divyanirdhar

खैरे कुणबी समाजातील समस्यांवर सरकारही गप्पच : गुणेश्वर आरीकर यांचा सवाल ः शिक्षणातील मागासलेपणामुळे समाज गंभीर संकटात

divyanirdhar

शेतकरी प्रश्नावर कृषी सभापती आमधरे यांनी शरद पवारांकडे का केली विनंती…वाचा

divyanirdhar

शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०

divyanirdhar

चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार

divyanirdhar

नाहरकत प्रमाणपत्रासाठी केली 50 हजारांची मागणी; सहायक नगर रचनाकार लाचेत अडकले

divyanirdhar