दिव्य निर्धार/ प्रतिनिधी
गोधऩी (नागपूर) : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला तर काहींवर उपासमारीची वेळ आली. पैसा नसल्याने अनेकांना औषध घेता येत नाही, जनतेची ही निकड लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या वतीने मास्क, सेनिटायजर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोधनी जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये लोकांना कॉंग्रेसच्या वतीने विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या कुंदा राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर गोधनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. गोधनी, बोखारा, गुमथळा, फेटरी, वलनीयासह इतर गावात साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गोधनीचे दीपक राऊत यांनी केले. तर यावेळी राहुल मनोहर, ज्योतीई राऊत, प्रीती अखंड, पं.स.सदस्य रूपाली, बोखाऱ्याच्या सरपंच अनिता पंडित, अरुण राऊत, रवी राऊत, राजू महाजन, बाबा पंडित, जगदीश जगताप, मुकेश ढोमणे, राजेंद्र अखंड, प्रशांत पवार, विजय शास्त्री, सुनिल दोडेवार, दीपक काकडे, प्रकाश नाखले, जावेद शेख, चंदू आवळे, ईश्वर काकडे, गोपाल कळंबे,जयश्री टाकरखेडे, रोहिणी खोरगडे, रीना वर्गीस, सुचिता गज्जलवार, शीतल महानंदी, राजू हेलोंढे, अनिल चिमोटे, योगेश सरोदे, सुरज बोरकर, आकाश शाहू, दीपक पाल मधुकर भांगे, सिद्धांत निकोसे, रमेश परतेकी, सोहन पर्तेकी उपस्थित होते.