Divya Nirdhar
Breaking News
mendhe
गुन्हानागपूरराजकीयविदर्भ

खासदार मेंढे म्हणाले, ग्रामीण भागात तयार करा रोजगार 

रणजित गणवीर/जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार

भंडारा  : ग्रामीण भागात अनेक हातांना काम देण्याच्या दृष्टीने क्लस्टर म्हणजे समूह तयार करून रोजगार उपलब्ध करून आज काळाची गरज आहे. गावातच अनेक हातांना रोजगार मिळून आर्थिक स्वयंपूर्णता आणता येईल. लाखापासून दागिने आणि विविध वस्तू निर्माण करण्याचे तयार करण्यात आलेले क्लस्टर जिल्ह्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं असंख्य हातांना काम देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेलं हे पहिलं क्लस्टर असून यासाठी खासदार मेंढे यांनी पाठपुरावा केला.

जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि सामुहिकरित्या ग्रामपातळीवर महिला आणि पुरुषांच्या हाताला काम मिळावे या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून क्लस्टर म्हणजे समूह तयार करून रोजगार देण्यावर भर असलेल्या खासदारांनी जिल्ह्यात कुठल्या विषयाला घेऊन क्लस्टर तयार करण्यात येतील या अनुषंगाने मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला. मागील दोन वर्षांपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू होते. प्रयत्नातून जिल्ह्यात आजघडीला आठ क्लस्टर विमान होण्याच्या मार्गावर आहे. क्लस्टर तयार व्हावेत म्हणून जिल्हा स्तरावर अधिकारी आणि इच्छुकांच्या बैठकाही मागील सहा महिन्यात युद्धस्तरावर घेऊन हे काम केले पूर्णत्वास नेले. आज अशाच एका. क्लस्टर ची सुरुवात खासदार यांच्या हस्ते करण्यात आली.

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग व त्रिनेत्र कृषी ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भंडारा फॉरेस्ट लाख प्रोसेसिंग क्लस्टर उपक्रमांतर्गत 15 दिवशीय लाख हस्तशिल्प व उत्पादने निर्माण प्रशिक्षणाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या मुरमाडी येथे केले. या प्रशिक्षणात ग्रामीण भागातील महिलांना लाखाची दागिने आणि वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भागातील महिलांना 365 दिवस रोजगार मिळावा आणि आर्थिक स्वयंपूर्णता यावी या हेतूने हे क्लस्टर तयार करण्यात आली असून धाबे टेकडी येथे सामूहिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. भविष्यात या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उत्पादित वस्तूंची खरेदी-विक्री असे उपक्रम सुरू राहतील. करू इच्छिणाऱ्या महिलांना संस्थेकडून वस्तू निर्मितीसाठी आवश्यक असलेली उपकरणे ही पुरवण्यात येणार आहेत.

आज यात उपक्रमांतर्गत 15 दिवशीय प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना खासदार सुनील मेंढे यांनी आज लोकांच्या हाताला असेल तर अशा प्ले स्टोर खऱ्या अर्थाने गरज आहे असे सांगितले. असे क्लास तर तयार करण्यासाठी समाजातील काही लोकांनी पुढे यावे. नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. त्या माध्यमातून तून क्लस्टर तयार करून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा असे सांगताना केंद्र शासन अशा पुढाकार घेणाऱ्या च्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला संचालक कापसे, संस्था अध्यक्ष महेश्वर शिरभाते, धनंजय घाटबांधे, पद्माकर बावनकर उपस्थित होते.

जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा वितरकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, गुणनियंत्रक अधिकारी प्रशांत मडावी आदी उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी बांधावर जाऊन ‘शेतकरी संवाद’ करावा. शेतीच्या प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा धोरण किंवा कार्यप्रणाली ठरवितांना उपयोगात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात पुढील आठवड्यापासून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिका-यांनी बांधावर पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

संबंधित पोस्ट

रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम मागासवर्गातील युवकांना देतोय ऍथलेटिक होण्याचे मोफत धडे !

divyanirdhar

प्रतिमा सुधारण्यासाठी अबब… 24 लाखांचे कंत्राट ः चंद्रपूर पालिकेचा प्रताप

divyanirdhar

बार्टीला आयएसओ ः धम्मज्योती गजभिये यांच्या कार्याला मिळाली झळाळी

divyanirdhar

राणे गरजले.. कोरोनातही मलिंदा खाणारे हे भ्रष्ट सरकार

divyanirdhar

सरपंच दीपक राऊत यांच्या नेतृत्त्वात शेकडो गरजूंना विविध साहित्याचे वाटप

divyanirdhar

कॉग्रेसला बर्वे तर भाजप-शिवसेनेला पारवेची काळजी; साडे सहा लाख बौद्धांचा वाली कोण?

divyanirdhar