Divya Nirdhar
Breaking News
manmode
ठळक बातम्यानागपूरविदर्भ

ह्युमँनिटी सोशल फाउंडेशन धावली विद्यार्थिनीच्या मदतीला; ऑनलाइन शिक्षणासाठी दिला मोबाईल भेट

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
नागपूर : कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ववस्त झाले. रोजगार केला. त्यांमुळे अनेकांनी शिक्षण घेता येत नाही, अशा कठीण प्रसंगात मदतीचा हात पुढे केला तो ह्युमँनिटी सोशल फाउंडेशन या संस्थेने. त्यांनी एका मुलीची वेदना ऐकून तिला मोबाइल दिला. ही समाजसेवा केली ह्युमँनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांनी. त्यांच्या मदत कार्याचा गौरव होत आहे.
नागपूर कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे सर्वच लोकांचे नुकसान होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप जास्त शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील वर्षी आणि यावर्षीसुद्धा शाळा बंद आहेत. आणि गरीब विद्यार्थीना ऑनलाइन वर्गासाठी मोबाईल किंवा टॅब सारख्या सोई उपलब्ध नाही.
काही दिवसांपूर्वी इशिक भाजे या विद्यार्थिनीने आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांना पत्र लिहिले त्यात “वडिलांचा रोजगार बंद झाला आहे, कामविण्याचे साधन बंद आहेत. घरात आम्ही दोन भावंडे असून कसेतरी तडजोड करून शिक्षण घेणे सुरू आहे. त्यातच इंटरनेटचा खर्च महिना 800 ते 1000 रुपये लागतो. आणि वडिलांचा रोजगार बंद असल्यामुळे आम्हाला हा खर्च परवडत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण आम्हाला परवडण्यासारखे नाही. शिक्षणासाठी आम्हाला परवडेल, अशी उपाययोजना करावी किंवा शाळेला शक्य नसेल तर शासनाने तशी व्यवस्था करावी म्हणजे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिक्षणाचा गंभीर प्रश्न सुटेल. अशा आशयाचे पत्र इशिकाने लिहिले. इशिकाने हे पत्र व्हायरल झाल्यावर ह्युमँनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांनी इशिकाच्या कुटुंबीय आणि श्री.सत्यसाई विद्या मंदिर शाळेशी संपर्क साधून इशिकला अँड्रॉईड मोबाईल भेट दिला. व तिच्या पुढील ऑनलाइन शिक्षणाचा भर उचलण्याची ग्वाही दिली.
यावेळी उपस्थित ढवळे सर आणि निलेश सोनटक्के सर आणि इशिकाचे आजोबा होते.

संबंधित पोस्ट

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar

नागपूर जिल्ह्यात सुनील केदार एक्स्प्रेस सुसाट;स्थानिक स्वराज्य संस्थानंतर आता सहकार क्षेत्रातही एकहाती वर्चस्व

divyanirdhar

आमदार समीर कुणावार म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी, “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” मोहीम राबविणार

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar

वकिली व्यवसाय नाही तर लढण्याचे शस्र; ॲड. सोनिया अमृत गजभिये ह्या वकिली व्यवसायात शिखरावर

divyanirdhar

रामदास आठवले यांच्या वक्त्याचा राजानंद कावळे यांच्याकडून निषेध; धम्मात राजकारण करून वातावरण बिघडविण्याचा आठवलेचा प्रयत्न

divyanirdhar