Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्र

धोबी सर्वभाषिक महासंघाची कार्यकारिणी जाहीर; डी.डी. सोनटक्के यांनी पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र

नागपूर ः धोबी सर्वभाषिक महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र दिले. नव्या कार्यकारिणीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याची भावना डी.डी. सोनटक्के यांनी व्यक्त केली.

sontakke
डी.डी. सोनटक्के

धोबी महासंघ (सर्वभाषिक) नागपूर शहर जम्बो कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना डी.डी.सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती पत्र देण्यात आले. धोबी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात ही संघटना लढत असून आतापर्यंत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. आरक्षणाचा प्रश्न असो की पारंपरिक लॉड्री व्यवसायाला वीजदरामध्ये सवलत मिळवून देण्याचा प्रश्न यावर महासंघाने आक्रमक भूमिका घेत न्याय मिळवून दिला आहे. यानंतरही समाजाच्या हिताचे प्रश्न सोडून देण्यासाठी प्राधान्याने प्रामाणिक पणे प्रयत्न ही संघटना करीत असल्याचे डी.डी. सोनटक्के यांनी सांगितले.

नवनिर्वाचित नागपूर शहराध्यक्ष राजकुमार आवळेकर यांची निवड करण्यात आली. ७५पैकी ६० पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. नवनिर्वाचित नागपूर शहर महिला अध्यक्षा जया मोतीकर यांची निवड करण्यात आली असून ५५ पैकी ५०महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. नवनिर्वाचित नागपूर शहर लाँन्ड्री अध्यक्ष प्रवीण तुरणकर यांची निवड करण्यात आली असून २५पैकी १८ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. नवनिर्वाचित युवा कार्याध्यक्ष निरंजन नाकाडे यांच्या उपस्थितीत ५०पैकी ४२ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. नागपूर शहर जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून २०५ पदाधिकारी पैकी १७० पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. प्रदेश पदाधिकारी रुकेशजी मोतीकर, भैय्याजी रोहणकर, संजयजी कनोजिया, दयारामजी हिवरकर, माणिकराव भोस्कर, उज्वलाताई कामरकर, नंदाताई क्षीरसागर, अशोकराव क्षीरसागर, मुलचंद निर्मलकर, सुनील श्रीवास,संदीप खेडकर, ज्ञानेश्वर भोस्कर, जीतेंद्र सौदागर, अनिल क्षीरसागर, शैलेश दौडकर, छाया भोस्कर, रमेशराव वावरकर,राजेंद्र ठोंबरे ,मन्सारामजी हिवरकर उपस्थित होते.

संचालन डॉ राजेश क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रज्ञाताई चौधरी यांनी केले .कार्यक्रमाची सांगता गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या बाबांच्या भजनाने झाली.

संबंधित पोस्ट

ग़डचिरोली: लसीकरणासाठी मंत्री वडेट्टीवार आग्रही, काय म्हणाले वाचा…

divyanirdhar

पदोन्नतीत अन्याय सहन केला जाणार नाही; गरजले राहुल घरडे

divyanirdhar

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी;‘कॅग’प्रमाणेच सरकारच्या समितीचेही त्रुटींवर बोट

divyanirdhar

मातंग समाजाच्या विकासासाठी बीर्टीने केला आराखडा; महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत विविध योजनांवर झाली चर्चा

divyanirdhar

बार्टी कार्यालय कुलुप बंदः  अनेक योजना रखडल्या आंदोलन करण्याचा इशारा

divyanirdhar

तीन हजारांवर माथाडी कामगारांना साडेपाच कोटींचा बोनस; सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची माहिती

divyanirdhar