नंददत्त डेकाटे : दिव्य निर्धार प्रतिनिधी
भिवापूर (नागपूर) ः भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रमणी बौद्ध विहार कमिटीद्वारे अभिवादन करण्यात आले. चंद्रमणी बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष चंदुलाल डेकाटे यांनी भगवान बौद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी मनोहर वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिक वाचनालयचे चिंतामण राऊत हे होते. यावेळी गावातील तलाठी डी. एम. भोयर, ग्रामपंचायत सदस्य विग्नेश्वर रामटेके, ग्रामपंचायत सदस्य कल्पना सुर्यवंशी, रवींद्र मेश्राम, गोवर्धन शिंगाडे, नंददत्त डेकाटे, रमेश राऊळ, विलास मेश्राम, शितल सावईमून, चरण शेंडे, मेघा मून उपस्थित होते.
उमरेड येथेही बाबासाहेबांना अभिवादन
उमरेड येथे तहसील कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण संजिव लोखंडे यांनी केले. यावेळी वंचित आघाडी चे कार्यकर्ते अशोक लोणारे, समीर गजघाटे, गौतम रंगारी, अॅड प्रबुद्ध सुखदेवे, विनोद वाघमारे, सुखाराम मेंढे, नंदकिशोर नेवारे, शैलेश लोखंडे, मुकेश बहादुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.