Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

पदभरती न केल्यास आरोग्यसेवा ढासळण्याच्या मार्गावर;  कॉग्रेसच्या  अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांचे सूचक विधान

उल्हास मेश्राम ः दिव्य निर्धार प्रतिनिधी

कुही(नागपूर) ः  : गेल्या दीड दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत डॅाक्टर, नर्स.आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस सेवा दिली. आता तिसर्‍या लाटेची शका वर्तविली जात आहे. अशा प्रसंगी आरोग्य यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र, राज्यातील आरोग्य सेवामध्ये अनेक पदे रिक्त आहेत. कुही तालुक्यातील आरोग्यसेवाही त्याप्रकारे आहे. अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे यांनी केली.

आरोग्य विभागातील चाळीस टक्के पदे रिक्त आहेत. म्हणून राज्य सरकारने तात्काळ आरोग्य कर्मचारी व अधिकारी पद भरती करावी, अशी मागणी कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे व माजी सभापती अरुण हटवार, परमेश्वर वाघमारे, गुरुदास केळझरकर, बालू करुटकर यांनी केली.

राजोला सर्कलसह कुही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र हे प्रभारी डाॅक्टर व नर्स यांच्या भरोशावर सुरू आहेत. एकच डॉक्टरकडे तीन चार ठिकाणी वैद्यकीय सेवा द्यावी लागत आहे. नर्स व आरोग्य कर्मचार्‍याची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाही लाईजास्तव वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकाच दोन-तीन केंद्रावर काम करावे लागत आहे. हे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दीड दोन वर्षापासून स्वतःच्या आरोग्याची परवा न करता कोरोनाच्या काळात नियमित सेवा देत आहेत. सेवा देता असताना दोन तीनदा आरोग्य अधिकारी व कर्मचारी पॉझीटीव्ह निघाले ओषोधोपचार घेतल्यानंतर बरे झाले. लगेच सेवेत हजर झालेत. ग्रामीण जनतेच्या आरोग्याची बाब गंभीरतेने घेवुन तात़डीने पद भरती करावी, अशी मागणी अनुसूचित विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल घरडे, माजी सभापती अरुण हटवार, परमेश्वर वाघमारे, गुरुदास केळझरकर, बालू करुटक यांनी केली

संबंधित पोस्ट

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar

ते ५७ कुटुंब रानबोडीचे ग्रामस्थ नाहीत?… अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका… वाचा

divyanirdhar

खरंच, आपण बौद्ध आहोत?

divyanirdhar

शेतकरी आंदोलन होणार अधिक आक्रमक, शेतकरी नेत्यांची घेतली ममतांची भेट

divyanirdhar

कोरोना रुग्णाचा उपचार मोफत करा : डी.डी. सोनटक्के

divyanirdhar

मनपाच्या लाचखोर लिपिकाला अटक; १० हजारांची मागितली लाच

divyanirdhar