Divya Nirdhar
Breaking News
पुणेबिझनेस

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर कमी करावा; महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांची मागणी .

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेने वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर कमी करावा याबाबतचे निवेदन बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना देण्यात आले आहे .पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना मदत केल्याबद्दल रमेश थोरात यांचा कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वैयक्तिक केस क्रेडीट कर्जाबाबत माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की , अनेक शिक्षक बांधवांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचा व्याजदर इतर राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा खूप जास्त आहे. राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे या बँकेतील वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर सात टक्के करण्यात यावा. यामुळे शिक्षक इतर बॅंकेत पगार खाते व कर्ज खाते उघडण्यासाठी जाणार नाहीत. तरी कॅश क्रेडिट व्याज दर  पर्यत कमी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात बॅकेच्या होणार्‍या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांनी दिले .यावेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार,जिल्हा नेते प्रशांत वाघमोडे, दौड तालुका अध्यक्ष दुर्योधन चव्हाण, तालुका उपाध्यक्ष श्याम बेंद्रे ,दौंड शिक्षक पतसंस्थेचे संचालक विश्वनाथ कौले हे पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित पोस्ट

बार्टीमुळे गवसला विकासाचा मार्ग ः महासंचालक धम्मज्योती गजभिये

divyanirdhar

‘बार्टी’ : बाबासाहेबांच्या विचार व प्रसाराचे केंद्र

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट करण्याचा जातीय संघटनांचा कट;  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पदमुक्तीवरून राज्यात आक्रोश

divyanirdhar

आत्तापर्यंत माझा संयम पाहिला, पण…रायगडावरून संभाजीराजे कडाडले 

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar

रामदास आठवले यांच्या वक्त्याचा राजानंद कावळे यांच्याकडून निषेध; धम्मात राजकारण करून वातावरण बिघडविण्याचा आठवलेचा प्रयत्न

divyanirdhar