दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः वकिलीचा व्यवसाय आणि समाजसेवा हे समीकरण घट्ट बसविले ते ॲड, सोनिया गजभिये यांनी. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध वकील म्हणून सोनिया गजभिये यांची ओळख आहे. समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने त्यांनी वकिली व्यवसायासोबतच समाजसेवेचे व्रतही पूर्ण करीत आहेत. शहरातील कुकडे ले आउटमध्ये गजभिये भवन आहे. इथे त्यांचे कार्यालय आहे. सामाजिक भान जोपासत त्या वकिलीचा व्यवसाय करीत आहेत. वकिलीचा व्यवसाय म्हटला की अनेक लोक त्यांच्याकडे पक्का प्रोफेशनल आहे, असे सहज बोलून जातात. मात्र, या चौकटीत सोनिया गजभिये बसत नाही. आधी समाजसेवा नंतर व्यवसाय हे त्यांचे ब्रीद आहे. अडल्यानडल्यांना त्या मदत करीत आहेत. वकिली व्यवसाय करताना अनेकांकडे कोर्टात केस टाकायला पैसे नसतात. बाजू खरी असून पैसा नसल्याने त्या न्यायालयात जाऊ शकत नाही. अशा रजंल्या गांजल्यांना केसेस त्या कोणतेही शुल्क न घेतात लढतात. आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत एक नव्हे तर अनेक केसेस त्यांनी विनाशुल्क लढल्या आहेत. महिलांच्या बाबतीत त्या अधिकच जागृत आहेत. कोणत्याही महिलेवर अन्याय झाला की त्या पेटून उठतात. पोलिसात केसेस दाखल करण्यापासून तर त्या केसेस न्यायालयात गेल्यानंतर त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यापर्यंत प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांसाठी एक मसिहाच आहेत. शोषित पीडित आणि वंचितांची त्या बाजू धरून लढतात. अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून स्वतः आंदोलन करून पुढाकार घेतात. अशा सोनिया गजभिये यांचा वकिली हा व्यावसायिक आहे. ८ ऑगस्ट १९८३ रोजी सोनिया गजभिये यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील अमृतराव गजभिये आधीपासूनच आंबेडकरी चळवळीशी जुळलेले होते. बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे यांचे ते खंदे समर्थक. घरी बैठका व्हायच्या. त्या बैठकीला त्या आवर्जून उपस्थित राहत होत्या. त्यामुळे सामाजिक सेवेचे बाळकडू तिथूनच मिळत गेले. त्या उच्च शिक्षित आहेत. बाजार आणि अर्थ व्यवस्थापनामध्ये त्यांना एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांनी सामान्य प्रशासनामध्ये त्यांनी एम.ए केले आहे. बी. कॉम. एलएलबी केले. यासह अनेक पदव्या घेतल्या आहेत. गेल्या सात वर्षांपासून त्या वकिलाचा व्यवसाय करीत आहेत. नागपूर उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुपरिचित आहेत. न्याय क्षेत्रातील अनेक विषय त्यांच्या आवडीचे असून त्यांनी त्यावर व्याख्यान दिले आहेत. ॲट्रोसिटी संदर्भातील लढा त्यांचा सुरू आहे.
या कायद्याअंतर्गत न्याय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असून याअंतर्गत अनेक केसेस त्यांनी लढल्या आहेत. दलित, आदिवासी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांचा मोठा लढा आहे.कोरोना आला आणि हातावर कमावून पोट भरणाऱ्यांचे काम बंद झाले. ज्यांचा कोणी वाली राहिला नाही, काय करावे? असा यक्ष प्रश्न ज्यांच्या समोर उभा राहिला त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला तो अॅड. सोनिया गजभिये यांनी. त्या ‘भीमराज की बेटी’ व बुद्धिस्ट महिला संघाच्या संस्थापक. त्यांनी कोणाचीही गरिबी न पाहता त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा जणू विडाच उचलला. लॉकडाउनमुळे मजूर, कामगार, लहान-मोठ्या व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. हाताला काम नसल्यामुळे उपासमार ओढवली. अशा वेळी ॲड. गजभिये यांचे समोर येणे त्यांच्यासाठी एका देवदूतापेक्षा कमी नव्हते. त्यांनी या काळात शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन उपासमार होत असलेल्या गरिबांना अन्नधान्यांचे वाटप केले. त्या नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. त्यांच्या दानशूर वृत्तीचे अनेकांनी कौतुक केले आहे. ॲड. सोनिया गजभिये यांनी दक्षिण नागपुरात गोरगरीब व निराधार नागरिकांकरिता निशुल्क दवाखाना व औषधी उपचार तथागत चॅरिटी क्लिनिकच्या माध्यमाने सुरू केले आहे. तसेच त्या उत्कृष्ट लेखिका असून त्यांचे लेख अनेक प्रकाशनांनी प्रकाशित केले आहे. महिला सरंक्षण कायद्यासंदर्भात त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.सोनिय गजभिये ह्या विपश्यना करीत असून त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करतात. त्याप्रमाणे आँबेडकरी विचारधारेचा प्रचार आहेत.सामाजिक कार्याची दखल घेत आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दी वूमेन लीडर ऑफ दी इअर, इंटर नॅशनल ब्रिलियन्स अवॉर्ड ॲज सोशियल वर्कर, इंडियन इन्सापायेशन वूमेन २०२१, बेस्ट सोशियल पर्सनॅलिटी इन ॲडव्होकेट अवॉर्ड २०१९ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. ॲड. सोनिया गजभिये यांनी वकिलीचा व्यवसाय करीत असताना त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कर्तृत्वावर भर असून युवकांनी वकिली क्षेत्रात येताना सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे, असे ॲड. सोनिया गजभिये यांचे मत आहे. अन्यायाविरोधात पेटण्याचे त्या कायदे क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आवाहन करतात. वकिली हा व्यवसाय नाही अन्यायाविरोधात लढणारे शस्त्र असल्याचे त्यांचे मत आहे.
मोफत दवाखाना सुरू केला
ॲड. सोनिया गजभिये यांनी दक्षिण नागपुरात गोरगरीब व निराधार नागरिकांकरिता निशुल्क दवाखाना व औषधी उपचार तथागत चॅरिटी क्लिनिकच्या माध्यमाने सुरू केले आहे. तसेच त्या उत्कृष्ट लेखिका असून त्यांचे लेख अनेक प्रकाशनांनी प्रकाशित केले आहे. महिला सरंक्षण कायद्यासंदर्भात त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.सोनिय गजभिये ह्या विपश्यना करीत असून त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करतात. त्याप्रमाणे आँबेडकरी विचारधारेचा प्रचार आहेत. ॲट्रोसिटी संदर्भातील लढा त्यांचा सुरू आहे. या कायद्याअंतर्गत न्याय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असून याअंतर्गत अनेक केसेस त्यांनी लढल्या आहेत. दलित, आदिवासी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांचा मोठा लढा आहे. सोनिया गजभिये ह्या विपश्यना करीत असून त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करतात. त्याप्रमाणे आँबेडकरी विचारधारेच्या प्रचारक आहेत.