Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यासंपादकीय

सोनिया गजभियेः द वुमेन लिडेर ऑफ द इयर

राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येईल तद्नंतरे या उक्तीचे मूर्तीमंत वस्तुपाठ म्हणजे, आपल्या आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतील भीमराज की बेटी ॲड.सोनियाजी गजभिये हे व्यक्तिमत्त्व होय. उच्च विद्या विभूषित असूनही ते कधीही मी खूप मोठी आहे, इतरांसारखे वागली नाही. सर्व गोष्टींची अनुकूलता असता असताना त्यांनी कधीही प्रामाणिकपणा सोडला नाही.

सतत आंबेडकरी चळवळीला आधार देण्याचा प्रयत्न केले सोनियाजी म्हणजे एक सुसंस्कृत व विनयशील व्यक्तिमत्त्व आहे,असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. साधेपणा शालींनता सर्व जाती धर्मांविषयी अपरंपार जिव्हाळा समाजसेवेची मोठी आस्था, समयसूचकता, सावधानता, सौजन्यशीलता, दूरदृष्टी अति परिश्रम घेण्याची तयारी, निर्भयता, मुत्सद्देगिरी प्रामाणिकपणा, चारित्र्यसंपन्न आसलेली कायाद्याची अभ्यासक वृत्ती हसतमुख चेहरा. गावकुसाबाहेरच्या सर्व अठरापगड लोकांना बरोबर घेऊन जाण्याची जिद्द इत्यादी शेकडो सद्गुणांचा साठा सोनियाजींच्या ठायी आहे. घरची परिस्थीती चांगली असतानासुद्धा त्या श्रीमंत्तीचं भलते अवडंबर त्यांनी कधीही माजवले नाही. सतत सामाजिक चिंतन करून नितीने आपले कर्तव्य करीत राहणे हा त्यांनी धर्म मानला भगवान बुद्धांचे वास्तव्य माणसांच्या कर्तव्यकर्मातच सामावले आहे. या न्यायानेच वागले गोरगरीब दलित त्यांच्या सामाजिक कार्यापासून ते कधीही दूर राहिले नाहीत. बदलत्या जमान्यातचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून आयुष्यात प्रत्येक पाऊल टाकल्याचे दिसून येते.
भारतीय इतिहासात सर्वप्रथम स्त्रियांना व्यक्ती म्हणून स्वीकारणारे पहिले महात्मा तथागत गौतम बुद्ध यांच्या ‘अत्त् दिप् भव्’ या विचाराने हजारो वर्षाच्या परंपरेला नाकारून स्त्रियांना सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने स्वतःला विकसित करण्याची संधी मिळाली. त्यातून स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून एक नवा स्त्रीवादी विचार जन्माला आला. त्या विचाराचे पाईक बनण्याचा प्रयत्न सोनियाने केला.
स्त्रियांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आले यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून आपले आयुष्य वेचले. हजारो वर्षे जातीच्या आधारावर असणारे शिक्षण सर्वप्रथम सर्वांसाठी खुले झाले. त्यातून स्त्रियांच्या शिकलेल्या पहिल्या पिढीचा उदय झाला ही पिढी परिवर्तनाच्या विविध प्रवाहामध्ये आपले योगदान देते. स्त्री शिक्षण, सामाजिक चळवळी व राजकीय चळवळी इ. विविध आघाड्यांवरवर स्त्रिया योगदान देतात. त्यात मी काही तरी समाजाचे देणं लागते म्हणून सोनियाजी सतत ५ वर्षापासून गरीब व गरजू लोकांना मोफत विधी सल्ला देण्याचे कार्य आणि गरीब,गरजू लोकांचे न्यायालयीन लढे मोफत पणे न्याय मिळवून देण्याचे काम करतात. विशेष म्हणजे संसार तुटणार नाही याची खबरदारी घेतात. यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना भीमराज की बेटी ,सावित्रीची लेक सामाजीक कार्यकर्ता, आशा कितीतरी आनेक पुरस्काराच्या मानकरी आहेत. या शिवाय आंतरराष्ट्रीय पातळी वरचा हा महत्वाचा समाजाला जातो तो असा-एशियन-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आयोजित, एशियन आफ्रिकन लिडरशिप अवार्ड, यांनी ३० एप्रिल २०२१, ला दिल्ली येथे ३ रा एशियन आफ्रिकन लीडरशिप फोरम हा प्रोग्राम आयोजित केलेला होता. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ॲड. सोनिया गजभिये यांना “द वुमेन लिडेर ऑफ द इयर” या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सोनिया गजभिये यांना विधी श्रेत्रातून पुरस्कार त्याच्या सामाजिक कर्याकरिता देण्यात आला. एशियन आफ्रिकन लिडरशिप फोरम अवार्ड, कार्यक्रम दिल्ली येथे ‘ ग्रँड हयात हॉटेल’ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला बाहेरच्या देशांचे राजदूत, बिझनेसमन, चित्रपट व सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, आंतरराष्ट्रीय मॉडेल्स, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, पत्रकार आणि उद्योजक, राजकीय नेते उपस्थित होते.
या पुरस्काराने त्यांच्या आत्मविश्वासा बरोबरच त्यांचे नाव सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीक झालेले आहे व सोबतच त्यांना अंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी व ऊर्जा मिळाली मिळाली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

डॉ. ज्ञानोबा कदम
चिपळूण, महाराष्ट्र
मो. ९९२३०७३२१९

संबंधित पोस्ट

राज्य लेखा परीक्षकांची नागपुरात कार्यशाळा; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar

सामाजिक न्याय विभागात अनेक अधिकारी ९ वर्षांपासून एकाच विभागात

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईबने उचलला विडा

divyanirdhar

शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी सामाजिक न्यायाचे सुमंत भांगे आक्रमक;आठवड्याला दिले बैठकीचे आदेश

divyanirdhar

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ः महाविद्यालयावर कारवाईची राष्ट्रवादीच्या नेत्या सोनम उके यांची मागणी

divyanirdhar