Divya Nirdhar
Breaking News
kusti
खेळठळक बातम्यानागपूरविदर्भ

हे काय… 60 हजार खुराकीसाठी अपुरे

जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार

नागपूर : वास्तविक पाहता सुवर्णपदक विजेत्या मल्लाला कमीत कमी 3 लाख रुपयांचे वार्षिक मानधन मिळणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण मल्लाला एका महिन्याला 30 हजारांपर्यंत खुराकचा खर्च येत असतो. चांगल्या मल्लाला 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खुराकसाठी महत्त्वाचे असलेल्या बदामाच्या किमती वाढल्या असून सर्वसाधारण मल्ल महिन्याला चार किलो व चांगला मल्ल महिन्याला सहा ते सात किलो बदाम खात असतो.

शासनाच्या वतीने फ्रीस्टाईल वरिष्ठ गट तसेच ग्रीको रोमन प्रकारातील कुस्तीपटूंना सुधारित मानधन घोषित करण्यात आले असून कुस्तीगिरांना आता वार्षिक 60 हजार रुपये मानधन मिळणार आहे. परंतु, हे अत्यंत अल्प असून, या मानधनात खुराकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुस्ती हा फार जुना खेळ आहे. आजही अनेक गावात आखाडे आहेत. कुस्ती खेळाला प्रोत्साहन म्हणून शासनातर्फे पहेलवानांना मानधन दिले जाते.

 फ्रीस्टाईल माती आणि गादी विभागातील कुस्तीगिरांना वजनी गटाप्रमाणे 60, 55 आणि 50 हजार रुपये, उदयोन्मुख कुस्तीगिरांना 50, 36 आणि 24 हजार रुपये, ग्रीकोरोमन गटातील कुस्तीगिरांना 60, 50 आणि 36 हजार रुपयांचे मानधन व महिला कुस्तीगिरांना 60, 50 आणि 36 हजार रुपये वार्षिक मानधन देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेत असताना यापूर्वी सहा क्रमांकांना देण्यात येणारे मानधन रद्द करून केवळ पहिल्या चार क्रमांकांनाच दिले जाणार आहे. यासाठी पूर्वी 2 कोटी रुपयांचा खर्च येत होता. या नव्या निर्णयामुळे केवळ 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून 40 लाख रुपयांवर शासनाने डल्ला मारला आहे. ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल प्रकारातील कुस्तीगिरांबरोबरच महिला कुस्तीगिरांच्या वजनी गटात बदल केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मानधनात बदल केला असून, प्रथम विजेत्याला 60 हजार रुपये, द्वितीय विजेत्याला 50 हजार रुपये, तर तृतीय विजेत्या दोन कुस्तीपटूंना प्रत्येकी 36 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांनाच हे मानधन मिळणार असून, 4 ते 6 क्रमांकाच्या खेळाडूंना या मानधन योजनेतून वगळण्यात आले आहे. यापूर्वी हे मानधन दिले जात होते. त्यामुळे शासनाच्या या निर्णयावर अनेक कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ जुलै रोजी निर्दशने

divyanirdhar

जीएसटी परिषदेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल

divyanirdhar

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

कॉंग्रेस नेत्यांना रामटेकमध्ये बौद्धांची ‘एलर्जी’

divyanirdhar

काँग्रेसमध्ये धुसफूस, नवा गडी नवा राज

divyanirdhar

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत मुलींची बाजी, 154 पुरस्कारांचे वितरण

divyanirdhar