Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

नागपूर : कधीकाळी गुळगुळीत रस्त्यांचे शहर अशी ओळख असलेले नागपूर नंतरच्या काळात खड्डेयुक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. दरवर्षी खड्डे बुजविण्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. बुजविल्यानंतर लगेच खड्डे ‘जैसे थे’ होतात. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च खड्ड्यात जातो. मनपाने दोन महिन्यात 2 हजार 364 खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याच कामासाठी आणखी कोट्यवधी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उपराजधानीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी तब्बल 300 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार शहरात अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. काहींचे काम अजूनही सुरू आहेत. तरीही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा महानगरपालिकेचा खर्च कमी झालेला नाही. रस्ते बांधणी, त्यानंतर पडलेले खड्डे बुजवणे यात महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. रस्त्यांचे दरवर्षी डांबरीकरण केले जाते. ते झाल्यावर दोन महिन्यात त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे दोन महिन्यात असे 2 हजार 364 खड्डे बुजवण्याची वेळ महापालिकेवर आली. यावरून रस्त्याच्या डांबरीकरणाची गुणवत्ता किती निकृष्ट दर्जाची आहे, याची कल्पना येते. गेल्या वर्षभरात डांबरी रस्त्यावरील 6 हजार 115 खड्डे बुजवण्यात आले.

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. डांबरी रस्त्यांची कामे केली जातात आणि दर सहा महिन्यातच पुन्हा खड्डे पडलेले दिसून येतात. शहरात रस्त्यांपेक्षा खड्डेच जास्त दिसतात. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढली जात असली तरी एकाच संस्थेला त्याचे काम दिले जाते. यावेळी इन्स्टा रोड पॅचर मशीनद्वारे खड्डे बुजविण्यासाठी 1 कोटी 99 लाख 99 हजार 493 रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, 1 कोटी 78 लाख 56 हजार 690 रुपयांच्या कामास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

गेल्यावर्षी खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स प्लांट विभागासाठी 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. 2020-21 या वर्षात महापालिकेने तब्बल 6 हजार 115 खड्डे बुजविले असले तरी पुन्हा तेवढेच खड्डे निर्माण झाले आहेत. सहा महिन्यांआधी तयार करण्यात आलेल्या शहरातील अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. निकृष्ट काम झाल्यानंतरही पुन्हा खाजगी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. एकीकडे आर्थिक चणचण असल्याचे कारण देत शहरातील अनेक विकासकामे ठप्प असताना महानगरपालिकेने शहरातील खड्डे बुजविण्यासाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करून कोट्यावधींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. महापालिकेचा स्वतंत्र हॉटमिक्स विभाग असताना हे काम खाजगी संस्थेला देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट

…तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

divyanirdhar

शेतकरी मिशन ‘सरकार आपल्या दारी’ ; किशोर तिवारी घेणार आढावा

divyanirdhar

ओबीसी, मराठा आरक्षणाच्या आग्रहामुळे आमदारांचे निलंबन; भाजप जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्त्वात जिल्हाभर आंदोलन

divyanirdhar

पदोन्नतीत अन्याय सहन केला जाणार नाही; गरजले राहुल घरडे

divyanirdhar

साडे सहा लाख बौद्ध मतदारांचे नेतृत्व करणाऱ्या किशोर गजभियेंवर अन्याय

divyanirdhar

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीरामजी यांची कॉपी केली : नवनियुक्त बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार

divyanirdhar