नागपूर, ः प्रशासनामध्ये धडाडीचे अधिकारी म्हणून अंत्यत कमी वेळात आणि कमी वयात प्रशासनात पकड मजबूत करणारे बार्टीचे माजी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या कार्याला पुन्हा झळाळी मिळाली. बार्टी प्रशासनातील घाण दूर करून तिला स्वच्छ करणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. बार्टीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. सध्या धम्मज्योती गजभिये लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मात्र, बार्टीमध्ये केलेल्या सुधारणाची दखल घेतल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले धम्मज्योती गजभिये यांची २०२० मध्ये बार्टीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी असतानाही त्यांना राज्यशासनाच्या सेवेत समाजसेवेसाठी रुजू झाले. बार्टी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेतील शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनुसूचित जातींमधील घटकांसाठी नवनवीन योजना आणून त्यांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीच वर्षात बार्टीचे नाव घराघरांत पोहोचले असून अनेकांच्या तोंडी बार्टीचे नाव येऊ लागले. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना आणि परदेशी शिष्यवृत्तीमध्ये वाढ तर विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून शेकडो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे द्वारे उघडून दिले. अल्पावधीत धम्मज्योती गजभिये यांचे नाव बार्टीसोबत लोकांच्या घरात आणि मनात पोहोचले. ग्रामीण भागातील लोकांना बार्टीचे महत्त्व समजू लागले आहे. अनेक योजना त्यांच्या कार्यकाळात कार्यान्वित करण्यात आल्या. त्यामुळेच बार्टीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले. धम्मज्योती गजभिये यांनी बार्टीमध्ये केलेल्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. लिडकॉममध्येही आपल्या कार्याचा ठसा उमटवतील, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.