पुणे ः राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भीमा कोरेगाव ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवास स्थान मुंबई पर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली.
श्री गौतम कांबळे म्हणाले की महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची सहविचार सभा पुणे येथे पार पडली .या सभेमध्ये भीमा कोरेगाव ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला मुंबई पर्यंत कार रॅली काढण्याचे ठरविण्यात आले .याबाबत माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत वेळोवेळी निवेदन देऊन व चर्चा करूनही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविल्या जात नाही त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे .
पुढील महत्वाचे प्रश्न शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पदोन्नतीमधील आरक्षण दिनांक ७ मे२०२१ चा शासन निर्णय मागे घेण्यात यावा व सर्व संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत.गेले १५ वर्षे कंत्राटी पद्धतीने मानधनावर काम करत असणारे विषय तज्ञ ,साधनव्यक्ती, विशेष शिक्षक , डाटा एंट्री ऑपरेटर व इतर गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे .शिक्षण सेवक मानधन ६००० वरून २५००० पर्यंत करण्यात यावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी तसेच मागील वर्षापासून प्रलंबित शिष्यवृत्ती रक्कम लवकर देण्यात यावी .शिष्यवृत्ती व फ्रीशिप रकमेत वाढ करण्यात यावी .विद्यार्थी वस्तीगृहाच्या सोयी सुविधांवर विशेष लक्ष देण्यात यावे . त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद वाढविण्यात यावी. शिक्षण हक्क कायद्यानुसार असणारी मागासवर्गीय मुलांच्या शैक्षणिक प्रवेश क्षमता २५टक्के वरून ३५टक्के करण्यात यावी व फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंत असणारे शिक्षण कायद्यानुसार १२ वी पर्यंत मोफत मिळावे.संस्थांमध्ये काम करणारे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मागासवर्गीय शिक्षकांच्या बदल्या वारंवार करण्यात येतात यामुळे मागासवर्गीय शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास संस्था देत असतात .त्यामुळे संस्थामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार संस्थांकडून काढून शासनाने ऑनलाईन पद्धतीने बदल्या शासनस्तरावरून कराव्यात .
अट्रोसिटी कायद्यानुसार प्रलंबित असणारे न्यायालयीन खटले प्रत्येक जिल्हास्तरावर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवून निकाली काढण्यात यावे. सावित्रीमाई फुले विद्यार्थिनी उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत मुलींना १ रू प्रतिदिन भत्ता देण्यात येतो . तो वाढवून १० रू प्रतिदिन करण्यात यावा . या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यासंदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठवण्यात आले .या आंदोलनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन निशिगंधा साळवे मॅडम ,अरुण जाधव ,प्रकाश घोळवे ,बबन आटोळे ,विठ्ठल सावंत, अशोकराव महाले ,मे .इब्राहिम ,अर्जुन कोळी ,गिरीश वाणी ,रवींद्र पाटील साळवे सर ,चंद्रकांत सलवदे ,मिलिंद थोरात,जयवंत पवार, राहुल गायकवाड इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले आहे .