Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमुंबई

तीन हजारांवर माथाडी कामगारांना साडेपाच कोटींचा बोनस; सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची माहिती

नागपूर ः नागपूर विभागातील तीन हजारांवर माथाडी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. याकरिता पाच कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी कामगार असरंक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी दिली आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाची लहर असल्याचे दिसून येते.
नागपूर आणि वर्धा माथडी व असरंक्षित कामगार मंडळाअंतर्गत तीन हजार ८२८ माथाडी कामगार कार्यरत आहेत. त्यांना योग्य प्रकारे सुविधा देण्याचे काम मंडळा मार्फत करण्यात येते. यावर्षी माथाडी कामगारांची दिवाळी आनंदात जावी याकरिता ५ कोटी ६० लाखांची बोनससाठी तरतूद करण्यात आली आहे. ही प्रत्येक माथाडी कामगारांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात आली आहे. अप्पर कामगार आयुक्त (विदर्भ विभाग) नितीन पाटणकर यांच्या मार्गदर्शनात आणि सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, मंडळाचे सचिव एम.पी. मडावी यांच्या नेतृत्वात हे नियोजन करण्यात आले.

संबंधित पोस्ट

श्री लेमदेव पाटील महाविद्यालयमध्ये फायर एक्स्टिंग्विशरचे प्रशिक्षण

divyanirdhar

नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा हुकुमशाह…विरोधकांचा आरोप

divyanirdhar

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

divyanirdhar

पीडित कुटुंबांना मिळणार नोकरी; मात्र ‘ड’ श्रेणीवर आक्षेप, शिक्षणानुसार नोकरी देण्यास अधिकाऱ्यांचे आडमुठे धोरण

divyanirdhar

कार्यकर्त्यांचा वाणवा तरीही राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाचे एकला चलो रे तुणतुणे…

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar