Divya Nirdhar
Breaking News
औरंगाबादठळक बातम्यानागपूरपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

साहित्य विचारमंचच्या कवी संमेलनात श्रोते मंत्रमुग्ध

नागपूरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच (डीबीए),च्या द्वितीय वर्धापनदिन व राज्यस्तरीय कविसंमेलन नुकतेच पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरूवेला कॉलनी येथे पार पडलेल्या कवी संमेलनात एकापेक्षा एक अशा मधूर कविता कवींनी सादर केल्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाला डीबीएचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विनोद जाधव यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून गायक अनिरुद्ध शेवाळे, बानाईचे अध्यक्ष राहुल परूळकर हे होते. या कार्यक्रमातील पहिल्या सत्रात १३ पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांना प्रकाशन पुरस्कार देण्यात आले. तसेच विविध जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांचा यथोचित गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रातील राज्यस्तरीय कवी संमेलन कवी व नाटककार शालिक जिल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. राज्यातील विविध शहरातून आलेल्या ५५ कवींनी आपल्या दर्जेदार रचना सादर केल्या. संमेलनात भोला सरवर, मनोहर गजभिये, माणिक खोब्रागडे, संजय गोडघाटे, वामन नील, प्रा. प्रशांत खैरे, प्रीतीबाला बोरकर, रवीकुमार जाधव यांनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष भावना खोब्रागडे होत्या. संचालन संदेश सावंत, नरेंद्र पवार, प्रीतीबाला बोरकर, आरती रोडे, प्रशांत खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी डीबीए नागपूर विभागीय जिल्हाध्यक्ष जगदीश राऊत व डीबीए चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भावना खोब्रागडे, अर्चना चव्हाण यांनी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला

divyanirdhar

आमदार समीर कुणावार म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी, “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” मोहीम राबविणार

divyanirdhar

मौद्याच्या नगराध्यक्ष कोण?, सामान्य माणसाला पडला प्रश्न

divyanirdhar

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र होणार बंद

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेचे लक्ष्यांक वाढवा; राहुल घरडे यांची मागणी

divyanirdhar

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे निधीअभावी प्रस्ताव प्रलंबित़; शासकीय नौकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण लागू करण्याची मागणी.

divyanirdhar