Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते मैदानात; म्हणाले, स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना संधी

नागपूर ः माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. नागपूर, वर्धा आणि इतर ठिकाणी ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्याची त्यांनी विडा उचलला आहे. गावागावांतील कार्यकर्त्यांना भेटून ते पक्षात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना पक्षात मोठी संधी त्यांचाच भविष्यात उमेदवारीसाठी विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगल्या प्रतिमेचे सुशिक्षित, तसेच जनमानसात जनाधार असलेल्या लोकांना उमेदवारी देणार असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक दृष्टिकोनातून तसेच पुढे होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रामटेक नगर परिषद निवडणुकीकरिता आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, रामटेक तालुका अध्यक्ष नितीन कापसे, शहर अध्यक्ष डॉ. नितीन वेरुळकर, प्रशांत किंमतकर, विजय पांडे, अरविंद अंबागडे, नकुल बरबते, नितीन चांडेकर, संदीप इनवाते, सचिन ठाकूर उपस्थित होते. समाजातील सर्वच घटकांनासोबत घेऊन तसेच सर्वच समाजाला प्रतिनिधित्व देऊन नगर परिषद निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा मानस त्यांना बैठकीत व्यक्त केला. यावेळी श्याम बिसन देवेंद्र डंभारे, घनश्याम सलामे, प्रवीण बंगैय्या, राहुल भावे, सुशील तेटेवर उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात बहुजन समाजाला सोबत घेऊन संघटन बनविणार : मोहिते

बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन एक नंबरवर आणणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच वर्धा जिल्ह्यात आगमन झाले. या प्रसंगी तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोहिते यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, दशरथ ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख, नितीन शिंदे, विश्वनाथ मस्के, पवन दांडेकर, रोशन तेलंगे, योगीता मानकर, रोहिणी पाटील, ततीन रणनवरे, राजेश सोळंके, एकनाथ डहाके, गुड्डू पठाण, रुपेश मस्के,सचिन हजारे, संजय धोंगडे, पप्पू कुकडे, राहुल भारती, बंडू मुळे, ओमप्रकाश ढवळे उपस्थित होते.

मोहिते म्हणाले की, वर्धा जिल्हा हा गांधीजींचा जिल्हा असून ज्या प्रकारे त्यांनी बहुजन समाजाला प्राधान्य देऊन गांधीजींनी आंदोलन केले, त्याचप्रमाणे आपणसुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात एक नंबरवर आणणार, असेही मोहिते यावेळी म्हणाले. यावेळी आशिष लोखंडे, वैभव गांजे, राहुल हिंगे, पंकज भुजाडे, कपील मुन, निलकमल आखुड, छोटू भुजाडे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित पोस्ट

राजोला जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचाच होईल विजय; राहुल घरडे यांचा विश्वास

divyanirdhar

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

divyanirdhar

…तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

divyanirdhar

प्रतिबंधित बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांनी राहावे सावध.. कोणी केले आवाहन…वाचा

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar

लसीकरणावर केंद्र शासनाने दीर्घ धोरण जाहीर करावे; माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांची मागणी

divyanirdhar