Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

जिल्हा परिषदेत भाजपचा स्वबळाचा नारा; १६ जागा जिंकण्याचा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचा दावा

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः भाजप नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत स्वबळाचा नारा दिला. १६ सर्कलमधील सर्वच उमेदवार जिंकू असा दावा नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला आहे. आज, त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.

भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट-निवडणुकांचे उमेदवार घोषित करण्यात आले. जिल्हा परिषद १६ व पंचायत समितीच्या ३१ ही जागेवर भाजप स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सर्व १६ जागांवर व पंचायत समितीच्या सर्व ३१ जागांवर भारतीय जनता पार्टी विजयी होणार असल्याचा विश्वास जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी व्यक्त केला. जिल्हा भाजपने यावेळी निवडणूक असलेल्या सर्व ठिकाणी ५० ते १०० प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन चर्चेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड सहमतीने केली. पक्षात कुठलीही नाराजी होणार नाही याची दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे उमदेवार ः पार्वती गुणवंतराव काळबांडे, नितीन सुरेशराव धोटे, निलेशकुमार राजेन्द्र धोटे, मिनाक्षी संदीप सरोदे, आयुषी जितेश धपके, संगीता विनोद मुलमुले, प्रभावती राजेश कडू, लक्ष्मणराव उमरावजी केणे, सदानंद चंद्रभानजी निमकर, योगेश निळकंठराव डाफ, अनिताताई रमेशराव चिकटे, विजयराव पुरुषोत्तमराव राऊत, राजेन्द्र विठठलराव हरडे, सुचिता विनोद ठाकरे, अर्चना कैलास गिरी, भोजराज हनुमानजी ठवकर यांचा समावेश आहे.

पंचायत समितीचे उमेदवार ः हेमलता गोपाल सातपुते, स्वप्निल अनंतराम नागपुरे, प्रतिभा दिलीप ठाकरे, शुभम मुरलीधर रोकडे, सौ.स्मिता युवराज हेलोंडे श्री अमोल रमेशराव भुरे सौ.जयश्री सुधीर चौधरी सौ.भारती मनोज आटणकर श्री माणीक काशीनाथ बलकी शिशुपाल वामनराव बेदरे, आशाताई रवीन्द्र चौधरी, सुखदेव काशीराम शेंदरे, अर्चना संदीप पेटकर, कविता सुभाष बावणकुळे, शानू विलास वैद्य, रामेश्वर बाबुरावजी लिचडे, पायल अमोल पिकलमुंडे, वंदना पद्माकर हटवार, प्रमोद शिवपालजी कातुरे, श्रावण साधू गोरले, ममता अजय जयस्वाल,कुंदा शैलेन्द्र मिसाळ, बबिता राहुल आंबटकर, सुरेश सुखदेवराव काळबांडे, लिलाधर जयपाल पटले, अनुपमा बबलु वैद्य, मिनाक्षी मनोहरराव कावटे,दिलीप धोंडबाजी कोल्हे, वैशाली चिंतामणजी भुजाडे, रमेश विठोबाजी रोहणकर शोभा मोरेश्वरराव चुटे यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

खासदार मेंढे म्हणाले, ग्रामीण भागात तयार करा रोजगार 

divyanirdhar

बदली रद्दच्या आदेशाने ग्रामसेवकांत नाराजी; आदेश मागे घेण्याची ग्रामसेवक संघाची मागणी

divyanirdhar

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

‘बार्टी’ : बाबासाहेबांच्या विचार व प्रसाराचे केंद्र

divyanirdhar

येणार तर कमळच, भाजप युवा नेते चंद्रशेखर राऊत यांचा दावा

divyanirdhar

खासदार नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय…

divyanirdhar