Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूर

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

नागपूर ः सावित्रीच्या लेकींनी माता जिजाऊचा आदर्श घ्यावा. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात गरूडझेप घेतली असली तरी अनेक क्षेत्रात पाया भक्कम करावयाचा आहे. त्यामुळे महिलांना स्वतःला कमजोर न समजता बलवान समजावे, असे आवाहन डॉ. नूपुर नेवासकर-मोडक यांनी केले.

उमरगाव ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नूपुर नेवासकर मोडक, पंचायत समिती सदस्या शुभांगी गायधने होत्या. कार्यक्रमाला आडकाच्या माजी सरपंच भावना चांभारे, ग्रामपंचायत उमरगावच्या सरपंच हिराताई शेवारे, ग्रा.प. सदस्या भाग्यश्री राऊत, मुक्ता ठाकरे,पल्लवी राऊत,अनिता नितनवरे, अजय फलके,शशिकांत नितनवरे ,माजी सदस्या शिल्पा राऊत, सविता मेश्राम उपस्थित होत्या. माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. डॉ. नूपुर नेवासकर मोडक यांचे सत्कार पल्लवी राऊत यांनी केला. शुभांगी गायधने यांचा सत्कार भाग्यश्री राऊत यांनी केला. कार्यक्रमाला उमरगावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

ग्रामसेवकांच्या प्रवासभत्त्यात वाढ कमी असल्याची खंत

divyanirdhar

वाचा… जादुटोण्याच्या संशयावरून निघाल्या तलवारी-बंदुका!

divyanirdhar

भटक्यांना कधी मिळणारा निवारा, सरकारकडेही नाही पैसा…

divyanirdhar

भाजपच्या ओबीसी विभागाने दिला गरजूंना मदतीचा हात

divyanirdhar

आमदार समीर कुणावार यांनी शहरवासियांना दिली अनोखी दिवाळी भेट

divyanirdhar

लसीकरणावर केंद्र शासनाने दीर्घ धोरण जाहीर करावे; माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुबोध मोहिते यांची मागणी

divyanirdhar