Divya Nirdhar
Breaking News
नागपूरपुणेमुंबईराजकीयविदर्भ

राष्ट्रवादीच्या इच्छुकांना दिले टार्गेट

नागपूर : महापालिकेची निवडणूक लढायची असेल तर इच्छुक उमेदवाराला पाचशे सदस्यांची नोंदणी करणे राष्ट्रवादी काँग्रेसने बंधनकारक केले आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची मोठी अडचण होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी नागपूरमध्ये पक्षाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रदेश कमेटी तसेच शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. फक्त पदे घेऊन पक्ष वाढणार नाही. प्रत्येकाला सक्रिय योगदान द्यावे लागले. याकरिता क्रियाशिल सदस्यांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती, वर्धा, गडचिरोली आदी जिल्ह्यांचा दौरा आटोपून जयंत पाटील नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांना हजार तर इच्छुकांना पाचशे क्रियाशील सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक ११ सप्टेंबरला होऊ घातली आहे. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक होईल. त्याकरिता अधिकाधिक क्रियाशिल सदस्य राष्ट्रवादीच्यामार्फत नोंदवले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याकरिता राज्यभर दौरा करीत आहेत. विशेष म्हणजे प्रदेश कार्यकारिणीत नागपूरमधील सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या मानाने पक्षाच विस्तर फारच मर्यादित असल्याने वरिष्ठ नेते नाराज आहेत.मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, सलील देशमुख, शब्बिरकुमार विद्रोही, राजू जैन, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, ईश्वर बाळबुधे, वर्षा शामकुळे, रमण ठवकर, वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सरकार काय मेल्यावर पैसे देईल़, रमाई घरकुल योजनेचा निधी आटला़

divyanirdhar

राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ जुलै रोजी निर्दशने

divyanirdhar

ग़डचिरोली: लसीकरणासाठी मंत्री वडेट्टीवार आग्रही, काय म्हणाले वाचा…

divyanirdhar

राजानंद कावळे : मृत्यूशय्येवरील रुग्णांना मदतीचा हात देणारा देवदूत

divyanirdhar

शेतकरी मिशन ‘सरकार आपल्या दारी’ ; किशोर तिवारी घेणार आढावा

divyanirdhar

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वैयक्तिक कॅश क्रेडीट कर्ज योजनेचा व्याजदर कमी करावा; महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांची मागणी .

divyanirdhar