Divya Nirdhar
Breaking News
crime
गुन्हानागपूरविदर्भ

तो आपला घात करेल’…पाच जणांची हत्या करून केली आत्महत्या

नागपूर : नागपुरात पित्याने अवघे कुटुंबच संपविले. पत्नी, मुलगी मुलासह सासू आणि मेहुणी यांची हातोडा आणि चाकूने घाव घालीत क्रूरपणे हत्त्या केली. त्यानंतर मारेकऱ्यानेही फाशी घेत आत्महत्या केली. पाचपावली या भागात सोमवारी दुपारी उघडकीस आलेल्या हत्त्याकांडाने उपराजधानी हादरली. आलोक मातूरकर (४५) असे निर्दयी गुन्हेगाराचे तर पत्नी विजया (३६), मुलगी परी (१६), मुलगा साहिल (१०), सासू लक्ष्मीबाई बोबडे, मेहुणी अतिषा बोबडे अशी मृतांची नावे आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

जवळचे म्हणता येईल अशा सर्वांचाच जावयाने खात्मा केला. नाईट ड्युटीमुळे घराबाहेर असलेले सासरे देवीदास बोबडे एकटेच बचावले. सर्वत्र गर्दी असूनही विलापासाठी त्यांना एकही जवळचा खांदा मिळू शकला नाही. पानावलेल्या डोळ्यांनी त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. जावई एक दिवस आपला घात करेल असे लक्ष्मी म्हणायची, हा शब्द त्याने खरा करून दाखवला, असे सातत्याने पुटपुटत होते.

भांबावलेल्या अवस्थेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी चकरा मारीत होते. तोंडातून बोल फुटणेही कठीण झाले होते. दोन्ही घरांसमोर प्रचंड गर्दी असली तरी त्यांना धीर देणारा किंवा भावना मोकळ्या करता येईल असा एसही खांदा गवसला नाही. आईजवळच मुलीचा मृतदेह असून अंगावर टिशर्ट शिवाय काहीच नसल्याचे लोक सांगत होते. लोकांकडून कळणारी एक एक माहिती त्यांना खोलखोल जखमा देणारी ठरत होती.
वयोवृद्ध असणारे देवीदास खासगी काम करून संसाराचा गाडा खेचत होते. रविवारी रात्री ते ड्युटीवर गेले होते. घरात भयानक आक्रीत घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. साहिल आणि परी या नातवांवर त्यांचा भारीच जीव होता. त्यांच्यासाठी नेहमीच खाऊ आणायचे. सोमवारी सकाळी कामावरून घरी परतले त्यावेळी पत्नी आणि मुलगी गदीवरच होत्या. अंगावर ब्लँकेट असल्याने त्या झोपल्या असल्याचा त्यांचा समज झाला. ते घराबाहेर पडले, बिल भरण्यासह अन्य कामे उरकून घेतली.

नातवांच्या भेटीसाठी ते विजयाकडे गेले. त्यावेळी शेजाऱ्यांकडून दार तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याने बाहेरूनच सर्वस्व गमावल्याचे लक्षात आले. घराच्या आत शिरण्याची हिंमत झाली नाही. थेट स्वतःच्या खोलीत गेले. निघ बघीतले असता पत्नी आणि मुलगीही रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. लागलीच आल्या पावली परतले.
बराच वेळ गर्दीतच उभे राहून तो स्वतःशीच बोलत होते. जावई असल्याने त्याचे (आलोक) घरी जाणे येणे होते. पण, सारेच त्याचा तिरस्कार करायचे. तो एक दिवस आपला घात करील असे अनेकदा लक्ष्मीने बोलून दाखवल्याची आठवण सांगतानाच सारेच संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

प्रतिमा सुधारण्यासाठी अबब… 24 लाखांचे कंत्राट ः चंद्रपूर पालिकेचा प्रताप

divyanirdhar

हुकूमचंद आमधरे यांच्या प्रयत्नाने उन्हाळी ज्वारीच्या खरेदीमर्यादेत वाढ

divyanirdhar

प्रतिबंधित बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांनी राहावे सावध.. कोणी केले आवाहन…वाचा

divyanirdhar

जिल्हा परिषदेचा दावा फोल, पाणीटंचाईची कामे अपूर्णच

divyanirdhar

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रम, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा पुढाकार

divyanirdhar

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीरामजी यांची कॉपी केली : नवनियुक्त बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार

divyanirdhar