Divya Nirdhar
Breaking News
नागपूरराजकीयविदर्भ

दवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक

नागपूर : नळ योजनेवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावेत. जेणेकरुन ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. पिण्याचे पाणी वाया जाता कामा नये, असे आदेश त्यांनी अभियंत्याना दिले. दवलामेटी ग्रामस्थांना दररोज पिण्याचे पाणी मिळेल याबाबत आठ दिवसात उपाय योजना कराव्या, असे सागून जनतेने सहकार्य करावे, असे मंत्री सुनील केदार यांनी केले. दवलामेटी येथील पिण्याच्या पाण्यावर ते अधिक आक्रमक झाले. त्यांनी पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.

 पिण्याचे पाणी अत्यावश्यक सेवेत येत असून ग्रामस्थांना नियमित दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले. यासोबतच झुडपी जंगलांचा प्रश्न वन विभागाशी चर्चा करुन सोडवावा, असे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत दवलामेटी येथील पाणी पुरवठा नियमित करणे व जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरिष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेंद्र भुयार, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

११२९ नोकरदार महिलांवर कारवाईचे ‘विघ्न’; लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड

divyanirdhar

शेतकरी प्रश्नावर कृषी सभापती आमधरे यांनी शरद पवारांकडे का केली विनंती…वाचा

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

येणार तर कमळच, भाजप युवा नेते चंद्रशेखर राऊत यांचा दावा

divyanirdhar

नगर भूमापनच्या शिबिरात अनेकांचे ‘समाधान; ४५२ जणांनी केले अर्ज; अनेकांचे अर्ज निकाली

divyanirdhar

भाजपच्या ओबीसी विभागाने दिला गरजूंना मदतीचा हात

divyanirdhar