Divya Nirdhar
Breaking News
आंतरराष्ट्रीयठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात आगमन

दिव्य निर्धार/ प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर असून आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी दहा वाजता दैनिक भास्कर तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 14 जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.

संबंधित पोस्ट

केवळ 18 टक्के वाटप; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून 80 टक्के वाटप

divyanirdhar

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

divyanirdhar

बांधकाम मजूर’ योजनेत बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी;ऑनलाइन सेंटर चालतोय व्यवसाय

divyanirdhar

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

divyanirdhar

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कोरोना रोखण्यासाठी हे केले उपाय…वाचा

divyanirdhar

नागपूर जिल्ह्यात सुनील केदार एक्स्प्रेस सुसाट;स्थानिक स्वराज्य संस्थानंतर आता सहकार क्षेत्रातही एकहाती वर्चस्व

divyanirdhar