Divya Nirdhar
Breaking News
nota1
गुन्हानागपूरविदर्भ

पैशाचा पडला पाऊस, हुबेहुब छापल्या शंभरच्या नोटा..

नागपूर :  तो स्वार्थासह लोभी होत गेला आणि त्याचे प्रत्येक पाऊल गुन्हेगारीकडे वळत गेले. भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क नोटांचा कारखाना सुरू केला. मात्र, पोलिसांची नजर दूरवर असते याचा त्याला विसर पडला. लोभ कशाचाही असो शेवट वाईटच होतो. अहंकारी व्यक्ती केवळ नात्यांची भिंत तोडते, परंतु लोभी नात्यांचा गळा आवळतो. लोभ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. रात्रीची झोप आणि दिवसाचा आराम हिरावून घेतो. आयुष्यात स्वार्थासह लोभ उत्पन्न झाला तर माणसाची पावले गुन्हेगारीकडे वळतात. त्या युवकाच्या बाबतीतही तेच घडले.

निलेश उर्फ शुभम कडबे (२४) असे त्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचे दोन साथीदार मारुफ खान (२४) आणि रवी बेसरे (३४) या दोघांनाही अटक केली. यु ट्युबवरील माहितीच्या आधारे निलेशने चक्क नोटा बनविण्याचा कारखाना उभा केला. हुबेहुब दिसणाऱ्या नोटाही छापल्या आणि बाजारात चालविल्या सुद्धा.
परिश्रम न करता पैशांचा पाऊस पाडायची कल्पना त्याला सूचली. सुरुवातीला तो चोऱ्या करू लागला. एकदा तर गोव्यातून मोटारसायकल चोरून नागपुरात आणली. दुसऱ्यांची कागदपत्रे चोरून किंवा बनावट कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपन्याकडून कर्ज घ्यायचा आणि मिळालेल्या पैशावर मौजमस्ती करायचा. आता मोठा हात मारायचा, या विचारातून त्याने यु ट्यूबवर चलनी नोटांची छपाई पाहिली. नोटा छापण्यासाठी चक्क प्रिंटर, शाई, पॉलिश, कटर, मोजमाप पट्टी, नोटेवरील तारेसाठी विशेष साहित्य आणि उच्च दर्जाचा कागद विकत घेतला. मानकापुरात किरायाने खोली घेतली आणि त्या ठिकाणी तो नोटा छापू लागला. निलेशसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वपोनि किशोर पर्वते, सपोनि परतेकी, संदीप काळे यांच्यासह पथकाने कारवाई करून सखोल चौकशी करीत आहेत.
 
 महिनाभराच्या प्रयत्नांनंतर यश
शंका येऊ नये म्हणून शुभम वारंवार खोली बदलवायचा. प्रिंटरच्या आधारे तो १०, २०, ५० आणि १०० च्या नोटा छापून बाजारात चालवू लागला. तो मित्रांसह पार्ट्या आणि मौज मस्ती करीत होता. दरम्यान, बनावट नोटांची चर्चा पोलिसांपर्यंत गेली आणि लोभ नडल्याने तो पोलिसांनी जाळ्यात अडकला.

 

 

संबंधित पोस्ट

बोरीच्या धरतीधन सीड कंपनीवर गुन्हा दाखल; चार कोटी 20 लाखांचा माल जप्त

divyanirdhar

तीन हजारांवर माथाडी कामगारांना साडेपाच कोटींचा बोनस; सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची माहिती

divyanirdhar

पद टिकवण्यासाठी सरपंचाचा अफलातून आटापिटा; प्रथम बनावट जातवैधता प्रमाणपत्र,नंतर खोटे मृत्यूपत्र सादर

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar

धोबी सर्वभाषिक महासंघाची कार्यकारिणी जाहीर; डी.डी. सोनटक्के यांनी पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र

divyanirdhar