Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

राजोला जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचाच होईल विजय; राहुल घरडे यांचा विश्वास

राजकीय प्रतिनिधी /दिव्य निर्धार

नागपूर ः नागपूर जिल्हा परिषदेतील १६ जिल्हा परिषद सर्कल आणि ३१ पंचायती समितीच्या गणाची निवडणूक होत आहे. या सर्व जागांवर कॉंग्रेसचा विजय होणार आहे. सोबत राजोला जिल्हा परिषद सर्कलमधील कॉंग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केला.

नागपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे पाळेमुळे एकदम घट्ट रोवले आहेत. गावागावांत कॉंग्रेसचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राजोला जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गणामध्ये विजय निश्चित आहे. भाजपने लोकांची फसवणूक केली आहे. महागाई आणि पेट्रोल दरवाढीला भाजप जबाबदार आहे. त्यामुळे मतदारांच्या मनामध्ये भाजपविषयी खदखद आहे. ही निवडणूक खदखद बाहेर काढण्याचे माध्यम आहे. भाजपने लोकांना वेठीस धरले आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन महागाईला उंचीवर नेऊन ठेवले आहे. रोजगार आणि इतर अनेक गोष्टीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप राहुल घरडे यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात राज्य शासनाने चांगले काम केले आहे. लोकांच्या उपचारापासून तर त्यांना मदत करण्यापर्यंत राज्य सरकारने मदत केली आहे. आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कोरानासारख्या संकटात लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यातही भाजपचा हात असल्याचा आरोप राहुल घरडे यांनी केला. ते म्हणाले की, जेव्हा राज्य शासनाने केंद्र सरकारला इम्पेरिकल डेटा मागितला तेव्हा त्यांनी दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केला. जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा भाजपनेच लोकांवर लादली असून त्याविरोधात भाजपला धडा शिकविणे आवश्यक असल्याचे मतही राहुल घरडे यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसचे तिन्ही उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील, यात कोणताही शंका नसल्याचा दावा कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केला.

संबंधित पोस्ट

अतिक्रमण हटविताना अडथळा, नगराध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हे दाखल

divyanirdhar

बदली रद्दच्या आदेशाने ग्रामसेवकांत नाराजी; आदेश मागे घेण्याची ग्रामसेवक संघाची मागणी

divyanirdhar

वाचा… जादुटोण्याच्या संशयावरून निघाल्या तलवारी-बंदुका!

divyanirdhar

आमदार राजू पारवे यांच्या हस्ते कुही तालुक्यात विविध कामाचे भूमिपूजन

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

वरिष्ठ शिक्षिका सरिता प्रबोध धोंगडे यांना सर्वोत्तम शिक्षक सन्मान

divyanirdhar